पणजी : म्हादई नदी कर्नाटककडे वळविण्याचा विषय मंगळवारी राज्यसभेतही उपस्थित करण्यात आला. खासदार लुईझिन फालेरो यांनी राज्यसभेत सांगितले की, म्हादई ही गोव्याची ६० टक्के जीवनदायिनी आहे. पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील अशा पश्चिम घाट परिसरात म्हादई नदी आहे. त्यासंदर्भातला कर्नाटकचा डीपीआर हा अवैध आहे. तसेच तो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करणारा आहे.