गोवा

गोवा : मोटारसायकल चोरीप्रकरणी केरळीयन युवकास अटक

अनुराधा कोरवी

हणजूण: पुढारी वृत्तसेवा : बुलेट मोटारसायकल चोरीप्रकरणी हणजूण पोलिसांनी राहुल दास (२७, रा. केरळ) या युवकास अटक करून चोरीची मोटरसायकल जप्त केली.

मिळालेल्या माहितीनुसार हेमंत शेखर (रा. कायसूव, बार्देश) याची बुलेट मोटारसायकल १ रोजी त्याने हणजूण येथे पार्क करून ठेवलेल्या जागेवरून चोरीस गेली. बरीच शोधाशोध करूनही ती न सापडल्याने हेमंत याने हणजूण पोलिसांत बुलेट चोरीची तक्रार दिली. तक्रारीनुसार हणजूण पोलिसांनी भादसं कलम ३७९ अंतर्गत गुन्हा नोंद करून तपास कामास सुरुवात केली. त्यांना चोरीची मोटारसायकल राहुल दास या केरळीयन युवकाकडे सापडली.

पुढील तपास हणजूण पोलिस स्थानकाचे निरीक्षक प्रशाल देसाई त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

SCROLL FOR NEXT