गोवा

गोवा : मुख्यमंत्र्यांचे बनावट व्हॉटस्अ‍ॅप खाते बनविणार्‍याला अटक

मोहन कारंडे

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावे बनावट व्हॉटस्अ‍ॅप खाते उघडून त्याच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री असल्याचे सांगून लोकांकडून पैसे मागणार्‍या संशयित आरोपीला सायबर क्राईम ब्रांच पोलिसांनी पकडले आहे. सय्यद अजाज (42, रा. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव असून त्याने गुन्हा कबूल केला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान सोशल मिडियावर गिफ्ट कार्डची मागणी करणारी बनावट खाती उघडून लोकाना फसवणार्‍यांची अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यात काही लोक प्रतिष्ठित राजकीय प्रतिनिधी आणि वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांच्या नावे अशी तोतयागिरी करत आहेत. इंटरनेटवरून बनावट फोटो डाउनलोड करून पैसे मागितले जात आहेत. त्यांच्यापासून लोकांनी सावध रहावे, असे आवाहन पोलिस अधिकार्‍यांनी केले आहे. औरंगाबाद (महाराष्ट्र) आणि दार्जिलिंग (पश्चिम बंगाल) येथील संशयित व्यक्तींची ओळख पटली असून सायबर पोलिस त्याचा तपास करत आहेत. बनावट खात्यांवरून पैसे किंवा भेटकार्ड मागणारे संदेश प्राप्त होतात, तेव्हा लोकांनी सावध राहावे, असे पोलिस अधिक्षकांनी आवाहन केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT