गोवा

गोवा : फोंड्यातील आमदारांनी राखले आपापले गड

दिनेश चोरगे

फोंडा; पुढारी वृत्तसेवा :  फोंडा तालुक्यातील एकोणीस पंचायतींच्या मतमोजणीत अखेर तालुक्यातील आमदारांच्या हातून काही पंचायती निसटल्या, तरी बहुतांश पंचायतींवर तालुक्यातील चारही आमदारांनी वर्चस्व राखल्याचे स्पष्ट झाले. तालुक्यात अनेक ठिकाणी माजी सरपंच व पंचांना पराभवाचा झटका बसला. अनेक ठिकाणी नवोदितांना मतदारांनी संधी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील मतमोजणी फर्मागुढी आयटीआय केंद्रात तीन ठिकाणी घेण्यात आली, मात्र या ठिकाणी सोयीपेक्षा गैरसोयीच जास्त जाणवल्या.

तालुक्यातील फोंडा, शिरोडा, मडकई आणि प्रियोळ या चारही मतदारसंघातील एकोणीस पंचायतींची मतमोजणी फर्मागुढी येथील आयटीआय केंद्रात सकाळी आठ वाजता सुरू झाली. संध्याकाळी सात वाजेपर्यंत ही मतमोजणी पूर्ण झाली. मात्र मतमोजणी दरम्यान, वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार दिसला. मतमोजणीसाठी मोठा मंडप उभारण्यात आला, मात्र बसण्यासाठी अवघ्याच खुर्च्या उपलब्ध केल्याने उमेदवार तसेच त्यांच्या मतमोजणी एजंटांची मोठी अडचण झाली. त्यातच जेवण्याच्या रिकाम्या, राहिलेले अन्‍न असलेल्या प्लेट्स इतस्ततः फेकलेल्या आढळल्या.

अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असतानाही उमेदवारांच्या समर्थकांनी गेटच्या बाहेर मोठी गर्दी केली होती. उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांना निवडून आल्याचे प्रमाणपत्र दिल्यावर बाहेर आल्यानंतर संबंधित उमेदवारांच्या समर्थकांकडून मोठा जल्लोष केला जात होता.

निवडून आलेले प्रभागनिहाय पंचसदस्य
बांदोडा ग्रामपंचायत
प्रभाग 1 – सुखानंद राघोबा गावडे, प्रभाग 2 – वामन नारायण नाईक, प्रभाग 3 – मनिषा तुळशीदास कुर्पासकर, प्रभाग 4 – अजय आनंद नाईक, प्रभाग 5 – राजू शंकर बांदोडकर, प्रभाग 6 – चित्रा प्रताप फडते, प्रभाग 7 – मुक्ता नारायण नाईक, प्रभाग 8 – व्यंकटेश घनश्याम गावडे, प्रभाग 9 – रामचंद्र रघू नाईक, प्रभाग 10 – सोनिया राजेंद्र नाईक, प्रभाग 11 – रेश्मा अस्लम मुल्ला.
बेतकी – खांडोळा पंचायत
प्रभाग 1 – संजीवनी खुशाली तळेकर (बिनविरोध), प्रभाग 2 – निकिता फडते, प्रभाग 3 – शेखर घाडी, प्रभाग 4 – रमिता गावडे, प्रभाग 5 – उदय नाईक, प्रभाग 6 – मनोजकुमार गावकर, प्रभाग 7 – श्रद्धा फडते, प्रभाग 8 – विशांत गावकर, प्रभाग 9 – दिलीप नाईक.
बेतोडा – निरंकाल – कोनशे – कोडार पंचायत
प्रभाग 1 – दिनेश कृष्णा गावकर, प्रभाग 2 – दुर्गाप्रसाद कमलाक्ष वैद्य, प्रभाग 3 – प्रशांत गणेश गावकर, प्रभाग 4 – चित्रा चंद्रशेखर सालेलकर, प्रभाग 5 – उमेश पांडुरंग गावडे, प्रभाग 6 – वैशाली सत्यवान सालेलकर, प्रभाग 7 – अक्षय रामा गावकर, प्रभाग 8 – चंद्रकांत मधुकर सामंत, प्रभाग 9 – मधू विष्णू खांडेपारकर, प्रभाग 10 – गीता सावळो गावडे, प्रभाग 11 – विद्या प्रशांत गावकर.
भोम – अडकोण पंचायत
प्रभाग 1 – शैला आदिनाथ नाईक, प्रभाग 2 – सोनू अशोक नाईक, प्रभाग 3 – सुनील धर्मा जल्मी, प्रभाग 4 – अब्दुल रेहमान खान, प्रभाग 5 – मिताली महाबळेश्‍वर फडते, प्रभाग 6 – प्रतिमा संजय फडते गावकर, प्रभाग 7 – दामोदर श्रीकांत नाईक.
बोरी ग्रामपंचायत
प्रभाग 1 – दुमिंगो कॉस्ता वाझ , प्रभाग 2 – सतीश दत्ता नाईक, प्रभाग 3 – जयेश जयवंत नाईक, प्रभाग 4 – किरण सूरज नाईक, प्रभाग 5 – सागर बबन नाईक बोरकर, प्रभाग 6 – रश्मी रवींद्र नाईक, प्रभाग 7 – सुनील रोहिदास बोरकर, प्रभाग 8 – विनय नागेश बोरकर, प्रभाग 9 – भावना मनुराय नाईक, प्रभाग 10 – संगीता रमेश गावडे, प्रभाग 11 – विनय श्रीकांत पारपती.
कुंडई ग्रामपंचायत
प्रभाग 1 – सर्वेश जयराम गावडे, प्रभाग 2 – विश्‍वास बाबलो फडते, प्रभाग 3 – संदीप मुकुंद जल्मी, प्रभाग 4 – रुपेश रामनाथ कुंडईकर, प्रभाग 5 – उज्वला घनश्याम नाईक, प्रभाग 6 – मनिषा महेंद्र नाईक, प्रभाग 7 – दीपाली इल्लो गावडे.
कुर्टी – खांडेपार ग्रामपंचायत
प्रभाग 1 – अभिजित शशिकांत गावडे, प्रभाग 2 – मनीष मंगलदास नाईक, प्रभाग 3 – विल्मा जॉन परेरा, प्रभाग 4 – हरेश सदानंद नाईक, प्रभाग 5 – नीळकंठ तुकाराम नाईक, प्रभाग 6 – परवीन बानो नावेद तहसीलदार, प्रभाग 7 – बाबू विद्याधर च्यारी, प्रभाग 8 – नावेद नूरमहंमद तहसीलदार, प्रभाग 9 – साजिदाबी अमजद सय्यद, प्रभाग 10 – संजना सुदेश नाईक, प्रभाग 11 – भिकू गोविंद केरकर.
दुर्भाट – आडपई – आगापूर ग्रामपंचायत
प्रभाग 1 – दीपा दिलीप नाईक, प्रभाग 2 – शिवदास रघू गावडे, प्रभाग 3 – चंदन गुणाकांत नाईक, प्रभाग 4 – गौरीश बाबल नाईक, प्रभाग 5 – क्षिप्रा मशाल आडपईकर, प्रभाग 6 – अमृता श्रीकांत नाईक, प्रभाग 7 – कृष्णा वसंत नाईक.
मडकई ग्रामपंचायत
प्रभाग 1 – संध्या नीलेश नाईक, प्रभाग 2 – विशांत मुकुंद नाईक, प्रभाग 3 – इराज्मो फ्रान्सिस आगियार, प्रभाग 4 – विनोद कृष्णनाथ नाईक, प्रभाग 5 – शैलेेंद्र विठ्ठल पणजीकर, प्रभाग 6 – सुषमा यानू गावडे, प्रभाग 7 – दुर्गादास गुरुदास नाईक, प्रभाग 8 – पूजा तुळशीदास गावडे, प्रभाग 9 – शिल्पा सुदेश गावडे.
पंचवाडी ग्रामपंचायत
प्रभाग 1 – उमेश सीताराम खुटकर, प्रभाग 2 – विशांत नरहरी गावकर,प्रभाग 3 – ख्रिस्तेव सांतियागो कॉस्ता, प्रभाग 4 – पावलो सॅबस्त्यांव गुदिन्हो, प्रभाग 5 – रामा रामनाथ नाईक, प्रभाग 6 – लीना सांतानो फर्नांडिस, प्रभाग 7 – लिबी सांतान सिल्वेरा.
कवळे ग्रामपंचायत
प्रभाग 1 – विठोबा बाबनी गावडे, प्रभाग 2 – सर्वेश निळू महात्मे आमोणकर, प्रभाग 3 – सुशांत महेंद्र कपिलेश्‍वरकर, प्रभाग 4 – प्रिया शंकर डोईफोडे, प्रभाग 5 – योगेश दामोदर कवळेकर, प्रभाग 6 – सुमित्रा संतोष नाईक, प्रभाग 7 – मनुजा पांडुरंग नाईक, प्रभाग 8 – सोनाली विकास तेंडुलकर, प्रभाग 9 – सत्वशीला खुशाली नाईक.
शिरोडा ग्रामपंचायत
प्रभाग 1 – सुनील विठ्ठल नाईक, प्रभाग 2 – योगेश प्रभाकर नाईक, प्रभाग 3 – साईदीप रघुनाथ नाईक, प्रभाग 4 – शिवानंद बाबूसो नाईक, प्रभाग 5 – अँड्र्यू सांतियो फर्नांडिस, प्रभाग 6 – राखी संजय गावकर प्रभाग 7 – सुहास नारायण नाईक, प्रभाग 8 – मेघनाथ अंकुश नाईक, प्रभाग 9 – मुग्धा मेघनाथ नाईक, प्रभाग 10 – भारती अमित शिरोडकर, प्रभाग 11 – रेश्मा भगवंत नाईक.
तिवरे – वरगाव ग्रामपंचायत
प्रभाग 1 – यशवंत लक्ष्मण जल्मी, प्रभाग 2 – जयेश जनार्दन नाईक, प्रभाग 3 – संजीव विनायक कुंडईकर, प्रभाग 4 – अपर्णा संकेत आमोणकर, प्रभाग 5 – एकनाथ राजाराम परब, प्रभाग 6 – सिद्धार्थ गुरुदास गाड, प्रभाग 7 – शिल्पा लक्ष्मीकांत वेरेकर, प्रभाग 8 – फ्रान्सिस इनासियो लोबो, प्रभाग 9 – सुमित्रा प्रकाश नाईक.
उसगाव – गांजे ग्रामपंचायत
प्रभाग 1 – नरेंद्र गोपीनाथ गावकर, प्रभाग 2 – प्रकाश विश्‍वनाथ गावडे, प्रभाग 3 – राजेंद्र गजानन नाईक, प्रभाग 4 – मनीषा कृष्णा शेणवी उसगावकर, प्रभाग 5 – विनोद जुझे पॉल मास्कारेन्हस, प्रभाग 6 – वैभवी वासुदेव गावडे, प्रभाग 7 – विलियम रुझारियो मास्कारेन्हस, प्रभाग 8 – रामनाथ गणेश डांगी, प्रभाग 9 – गोविंद रत्नाकर परब, प्रभाग 10 – संगीता विठो डोईफोेडे, प्रभाग 11 – रेश्मा तानाजी मठकर.
वेलिंग – प्रियोळ – कुंकळ्ये ग्रामपंचायत
प्रभाग 1 – हर्षा हेमंत गावडे, प्रभाग 2 – रंगनाथ मधू कुंकळ्येकर, प्रभाग 3 – आदिती देविदास गावडे, प्रभाग 4 – सुभाष वासुदेव गावडे, प्रभाग 5 – रणजीत सदानंद प्रभुदेसाई, प्रभाग 6 – वैभवी वीरेंद्र म्हार्दोळकर, प्रभाग 7 – अशोक धर्मा जल्मी, प्रभाग 8 – रुपेश रोहिदास नाईक, प्रभाग 9 – दिग्विता दिलीप सतरकर, प्रभाग 10 – दिशा विश्‍वास सतरकर, प्रभाग 11 – दिनेश तुळशीदास नाईक.
वेरे – वाघुर्मे ग्रामपंचायत
प्रभाग 1 – बाबू बाबनी गावडे, प्रभाग 2 – स्वाती सत्यवान पालकर, प्रभाग 3 – रोहन विठ्ठल तारी वळवईकर, प्रभाग 4 – अक्षय धर्मा नाईक, प्रभाग 5 – नवनाथ नारायण वेलकासकर, प्रभाग 6 – लोचन संतोष नाईक, प्रभाग 7 – शोभा नारायण
पेरणी.
वाडी – तळावली ग्रामपंचायत
प्रभाग 1 – वसुंधरा येसो सावंत, प्रभाग 2 – रामचंद्र दादू नाईक, प्रभाग 3 – दिलेश प्रभाकर गावकर, प्रभाग 4 – प्रकाश आवलो नाईक, प्रभाग 5 – मनीषा महेश नाईक, प्रभाग 6 – मनुजा राजा नाईक, प्रभाग 7 – दीप्ती दिवाकर साळगावकर.
वळवई ग्रामपंचायत
प्रभाग 1 – काशीनाथ के. नाईक, प्रभाग 2 – नीळकंठ गजानन नाईक, प्रभाग 3 – विनायक औदुंबर वेंगुर्लेकर, प्रभाग 4 – अंजली विनायक वेंगुर्लेकर, प्रभाग 5 – मिथिला महेंद्र शेट.
केरी ग्रामपंचायत
प्रभाग 1 – सचिन केरकर, प्रभाग 2 – वामन गावडे, प्रभाग 3 – कांचन केरकर, प्रभाग 4 – तुळशीदास नाईक, प्रभाग 5 – तृप्ती नाईक, प्रभाग 6 – सुलक्षा जल्मी, प्रभाग 7 – आश्‍विनी गावडे.

तालुक्यात चार दाम्पत्यांचा विजय
तालुक्यातील चार पंचायतींमध्ये चार दाम्पत्ये निवडून आली. शिरोडा पंचायतीत मेघनाथ शिरोडकर व मुग्धा शिरोडकर, कुर्टी – खांडेपार पंचायतीत नावेद तहसीलदार व परवीन तहसीलदार तसेच वळवई पंचायतीत विनायक वेंगुर्लेकर व अंजली वेंगुर्लेकर आणि केरी पंचायतीत तुळशीदास नाईक व तृप्ती नाईक अशी चार दाम्पत्यांना मतदारांनी या पंचायतीवर प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून दिले आहे.

आमदारांकडून अंतर्गत पाठिंबा…
फोंडा मतदारसंघाचे आमदार रवी नाईक, शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर, मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर व प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी आपापल्या उमेदवारांना आतून पाठिंबा दिला होता. एकाच प्रभागात संबंधित आमदारांचे अनेक उमेदवार उभे ठाकल्याने आमदार अडचणीत आले होते; मात्र बहुतांश उमेदवार निवडून आल्याने सध्या तरी तालुक्यातील पंचायतींवर विद्यमान आमदारांचे वर्चस्व राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT