गोवा

गोवा : फोंडा येथील पोस्टात 60 हजारांची अफरातफर

मोहन कारंडे

फोंडा : फोंड्याच्या पोस्ट कार्यालयात ग्राहकांच्या पैशांची अफरातफर झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फोंडा पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविला आहे. फोंडा पोस्ट कार्यालयात सहायक म्हणून काम करणार्‍या मुकेश बाजपेयी याच्याविरुद्ध हा गुन्हा बुधवारी (दि. 22) नोंद झाला. याप्रकरणी फोंडा पोस्ट कार्यालयाचे निरीक्षक प्रमोद मागरे यांनी फोंडा पोलिसांत तक्रार दिली आहे.

संशयित मुकेश बाजपेयी हा फोंड्यातील पोस्ट कार्यालयातील कर्मचारी आहे. या पोस्टात फोंडा तालुक्यातील विविध ठिकाणचे ग्राहक विम्याचे पैसे भरण्यासाठी येतात. पण, संशयित मुकेश बाजपेयी याने ग्राहकांकडून 60 हजार 637 रुपये घेतले व ते पोस्टात जमा केलेले नाहीत, तसेच या पैशांची नोंद संगणकावरही केलेली नाही. संशयित मुकेश बाजपेयी याने गेल्या 31 ऑगस्ट 2021 ते 21 ऑक्टोबर 2021 पर्यंतचे हे पैसे पोस्टात जमा केले नसल्याने खळबळ उडाली आहे. ग्राहकांकडून तक्रारी आल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली. फोंडा पोलिसांनी याप्रकरणी मुकेश बाजपेयीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

SCROLL FOR NEXT