गोवा

गोवा : पेडणे पोलिसांचे अचानक ‘सर्च ऑपरेशन’

दिनेश चोरगे

पेडणे; पुढारी वृत्तसेवा :  पोलिस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत यांच्या नेतृत्वाखाली मोरजी पंचायत क्षेत्रातील सर्व वाड्यावरील हॉटेल, रेस्टॉरंट, गेस्ट हाऊस पिंजून काढण्यात आले.

यावेळी कोण बेकायदेशीरपणे वास्तव्य करून आहे, कोणी सी फॉर्म भरले नाहीत किंवा पोलिसांपासून माहिती लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे किंवा एखादा नागरिक गुन्ह्यात अडकलेला आहे, अमली पदार्थांची देवाणघेवाण करत आहे काय, याची तपासणी अचानक पेडणे पोलिसांनी 6 रोजी मोरजी पंचायत क्षेत्रात सुरू केल्याने गावकरी ग्रामस्थ भयभीत झाले.

उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर, पेडणे पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली 100 पेक्षा जास्त पोलिस, होमगार्ड जमा झाले. या परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

 व्हिसा संपल्याने दोघे ताब्यात
अधिकार्‍यांनी प्रत्येक पोलिसांच्या तुकडीला पूर्ण गाव पिंजून काढण्याची सूचना केली. पोलिसांनी वाड्या वाड्यावर जाऊन चौकशी केली. त्यामुळे नागरिकही एकमेकांना फोन करून याची सूचना देत होते. पेडणे पोलिसांनी दोन विदेशी पर्यटक व्हिसा संपूनही रहिल्याबद्दल तापसणीवेळी आढळून आले. दोघांनाही ताब्यात घेऊन पुढील तपास चालू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT