पर्वरी : येथील विद्या प्रबोधिनी शाळेजवळ शनिवारी संध्याकाळी अचानक एका कारला आग लागली. यात कार खाक झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सदर होंडा जाज ही कार दिल्ली नोंदणीकृत असून त्यात संजीत वाई व आणखी एकजण होता. त्यांनी प्रसंगधान राखून लगेच गाडीतून उडी घेतली त्यामुळे अनर्थ टळला.
अग्निशामक दलाने घटनास्थळी जावून आग आटोक्यात आणली. पर्वरी पोलिस स्थानकाचे हवालदार गिरीश राऊळ यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सदर कार तोर्डाहून पणजी येथे जात असताना ही घटना घडली.