पणजी; पुढारी वृत्तसेवा : तिसवाडी तालुक्यातील 18 पंचायतीच्या 158 प्रभागापैकी चार प्रभागातील उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे उर्वरित 153 प्रभागांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर दोन ठिकाणी झाली. प्रत्येकी 9 पंचायतींची मतमोजणी दोन जागी सुरू झाली. डॉ. मुखर्जी स्टेडियमच्या बाहेर उमेदवारांच्या समर्थकांनी एकच गर्दी केली होती. उमेदवार जिंकून बाहेर आल्यानंतर त्यांचे समर्थक हार घालून त्यांचे स्वागत करत एकच जल्लोष करत होते. संध्याकाळपर्यत सर्व निकाल जाहीर करण्यात आले.
पंचायत : प्रभाग – विजयी उमेदवार यानुसार
चिंबल ः 1 – मोहम्मद नीझार, 2 – शंकर नाईक, 3 – शबना बद्रापूर, 4 – मधुला मादा, 5- दृष्टी कवळेकर, 6 – संदेश शिरोडकर, 7 – मनीषा चोपडेकर, 8 – रवींद्र चोपडेकर, 9 – संदेश चोपडेकर, 10 – कृपा काणकोणकर, 11 – रोझी उतकुरी
सांताक्रुझ ः 1 – एलसन ब्रागांझा, 2 – लाफीरा एलीवेरा फर्नांडीस, 3 – इनासियो परेरा, 4 – लुईझा फर्नांडिस, 5 – संदीप सावंत, 6 – मंगेश गावस, 7 – जेनीफर एलिवेरा, 8 – पिटर अरावजा, 9 – परपेच्युुआ डिसोझा, 10 – रोझी फर्नांडिस, 11 – आमाबेल गोम्स
मेरशी ः 1 – राकेश फातर्फेकर, 2 – प्रमोद कामत, 3 – दयेश वेंगुर्लेकर , 4 – सुशांत गोवेकर, 5 – वाल्टर डिसोझा, 6 – सेलिया सिक्वेरा , 7 – फिलोमिनो परेरा, 8 – आशीस फर्नांडिस , 9 – संध्या होबळे , 10 – मुकेश शिरगावकर, 11 – सुचिता पिळर्णकर .
कुडका- बांबोळी- तळावली ः 1 – विनेश अडपईकर, 2 – मारीया डिकुन्हा, 3 – किशोर कुट्टीकर , 4 – सुषमा शिरोडकर, 5 – महानंद कुंडईकर, 6 – माया शिरगावे, 7 – लीना नाईक, 8 – दिवोना कोरगावकर, 9 – सूर्यकांत आंद्रादे, 10 – साधाना गोन्साल्वीस, 11 – दिपाली काणकोणकर.
शिरदोन – पाळे ः 1 – नूतन शिरोडकर, 2 – जोयलॉन अफान्सो, 3 – भारत शिरोडकर , 4 -जितेंद्र मंगेशकर, 5 – तेजा कुकळ्ळीकर, 6 – सुवर्णा कुकळ्येंकर, 7 – मनोज पालकर.
भाटी ः 1 – कृष्णनाथ नाईक, 2 – मारीया फर्नांडिस, 3 – एस्पेन्सीया फर्नांडिस, 4 – फ्रान्सिस्को डिसोझा, 5 – साबीना फर्नांडिस, 6 – कातारीना फर्नांडिस, 7 – माझेल फर्नांडिस (बिनविरोध) .
आगशी ः 1 – अॅलन सिल्वेरा (बिन विरोध), 2 – बेनी सिल्वेरा, 3 – रेजीना मास्कारेनस, 4 – सेली गोन्साल्वीस, 5 – जुलीअस आल्मेदा, 6 – मोनी फर्नांडिस, 7 – हिरेश कवळेकर, 8 – पियेदाद फर्नांडिस, 9 – एमी फर्नांडिस, 10 – लक्षदीप गावस, 11 – जुलीयेटा रिबोलो .
आजोशी – मंडुर ः 1 – तेजस्वी नाईक , 2 – पावलीन ओलीवेरीया, 3 – प्रशांत नाईक , 4 – नंदेश मयेकर , 5 – प्रेमांनंद कुर्टीकर, 6 – फ्रान्सिस्को पो , 7 – अशीता अफान्सो .
नेवरा ः 1 – आदित्य सावंत, 2 – होनोरिना आरावजो, 3 – दिनेश नाईक , 4 – जोयल गोन्साल्वीस, 5 – प्रताप नाईक, 6 – सुनीता नाईक, 7 – मनीषा नाईक.
गोवा वेल्हा (सांत आंद्रे) ः 1 – कारोलिना डिसोझा, 2 – राजश्री च्यारी, 3 – इयोनो डिसोझा , 4 -फ्रान्सिस्को डिसोझा, 5 – अग्नेलो फर्नांडिस, 6 – मोनिका मिरांडा, 7 – मयूर धोंड, 8 – आंद्रे परेरा, 9 – एमिलिया कार्वालो.
खोर्ली ः 1 – चंद्रशेखर काणकोणकर, 2 – प्रज्ञा शिरवईकर, 3 – विरेश असोलकर, 4 – अंजली चोडणकर, 5 – सुप्रिया केरकर, 6 – फ्रिडा पो, 7 – लुयीयानो परेरा, 8 – काशिनाथ गावकर, 9 – गोरखनाथ केरकर.
कुंभारजुवा ः 1 – सुधीर फडते , 2 – अर्चना परब, 3 – कृष्णा (विक्रम) परब, 4 – सुरेश नाईक, 5 – अनुज नाईक, 6 – नंंदकुमार शेट, 7 – विंदा जोशी, 8 – सचिन गावडे, 9 – शेजल नार्वेकर (बिनविरोध) .
सांत इस्तेव ः 1 – साईरा नार्वेकर, 2 – सुझीत सिल्वेरा, 3 – नालास्को मिनेझीस, 4 – इस्तेंव रिबोलो, 5 – अजय तारी (बिन विरोध), 6 – स्मिता सावंत , 7 – करिश्मा मोंतेरो .
जुने गोवे ः 1 – विनोद देसाई , 2 – विश्वास कुट्टीकर, 3 – अंबर आमोणकर, 4 – सान्ड्रा गोन्साल्वीस , 5 – हर्षद धुळापकर, 6 – विनायक फडते, 7 – मेधा पर्वतकर, 8 – सपना भोमकर, 9 – सारिका नाईक .
गोलती – नावेली ः 1 – सुनील म्हार्दोळकर, 2 – तनीषा पिळर्णकर, 3 – मारीयो पिंटो, 4 – व्हीक्टर फर्नांडिस, 5 – विश्वास दुर्भाटकर, 6 – तनुजा नाईक, 7 – रंजिता कोरगावकर .
सा मातियास ः 1 – मारीया वाझ, 2 – स्वप्निल भोमकर, 3 – रुपेश होमखंडी, 4 – प्रशांत हरवळकर , 5 – शब्देश मांद्रेकर, 6 – सुप्रिया तारी , 7 – अनुराधा वळवईकर.
करमळी ः 1 – कुष्ठा सालेलकर, 2 – राजेंद्र नार्वेकर, 3 – भुवनेश्वर फातार्फेकर , 4 – रेश्मा मुरगावकर, 5 – सुदेश कुंडईकर, 6 – राजेश नाईक, 7 – अँजेला वालादारीस, 8 – जयेश नाईक, 9 – तियोफीनो कार्दोझ .
चोडण माडेल ः 1 – पंढरी वेर्णेकर , 2 – रमाकांत प्रियोळकर, 3 – संजय कळंगुटकर, 4 – परपेच्युआ कुलासो , 5 – सिलवाने परेरा, 6 – पांडुरंग वायंगणकर, 7 – पूजा चोडणकर, 8 – रवींद्र किनळेकर, 9 – जयंती नाईक.
होबळे यांची पत्नी सात मतांनी विजयी
भारतीय जनता पक्षाचे नेते व बहुजन महासंघ गोमंतकचे अध्यक्ष अनिल होबळे यांच्या पत्नी संध्या होबळे या मेरशी पंचायतीच्या प्रभाग 9 मधून अवघ्या सात मतांनी विजयी झाल्या.