गोवा

गोवा : ताज्या मासळीसाठी खवय्यांची गर्दी

दिनेश चोरगे

मडगाव; पुढारी वृत्तसेवा :  राज्यात दोन महिन्यानंतर मासेमारी सुरू झाली. दक्षिण गोव्याच्या घाऊक मासळी बाजारात व किरकोळ मासळी बाजरात ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. ताज्या मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत. इसवन 900, पापलेट 700, तर टायगर प्रॉन्स 600 रुपयाला रविवारच्या बाजारात विकल्या गेल्या आहे.

मासेमारी दोन महिन्यांसाठी बंद होती. परिणामी, मासळी बाजारात शुकशुकाट निर्माण झाला होता. मात्र ही बंदी सोमवारी 1 ऑगस्ट रोजी उठल्याने मच्छीमारांनी मासेमारी सुरू केली आहे. दरम्यान, सोमवारपासून ताजी व फडफडीत मासळी प्राप्त होणार असल्याने सुरमई, चणक, टायगर प्रॉन्स आणि मुड्डोश्यो या मासळीचे दर दुप्पट दराने वाढले आहेत.

बर्फातील फ्रोजन फिश बाजारात दाखल होणे बंद झाले आहे. आता बाजारात ताजी फडफडीत मासळी दाखल होत आहे. बाजारात वेगवेगळ्या प्रकारची मासळी दाखल झाली असून मत्स्य खवय्ये मासळी खरेदीसाठी उत्साही होते. बोट मालक अँथनी वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, मासेमारीसाठी बोटमलकांच्या जहाजावर कामगारांची वानवा असल्याने अत्यंत कमी जहाज पाण्यात उतरत आहेत. मासेमारी व्यवसाय सुरळीत होण्यासाठी किमान एक महिना लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माशांचे दर

इसवन : 900 किलो
चणक : 700
पॉपलेट : 700 (पांढरी)
पॉपलेट : 400 (काळी)
कोळंबी : 300 ते 350
टायगर प्रॉन्स : 600
मुड्डोशो : 600
मोडसो : 300
बांगडे : 250
बांगडुलो 150 रुपयाला वाटा
खेकडे 1000(10 खेकडे)
तिसरे 200 रुपयाला वाटा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT