गोव्यात लवकरच झिरो ई-एफआयआर प्रणाली लागू होणार असून सायबर गुन्ह्यांविरोधात त्वरित कारवाई शक्य होणार आहे.
१ लाख रुपयांपर्यंतच्या सायबर फसवणुकीसाठी ऑनलाईन ई-एफआयआर नोंदवण्याची सुविधा नागरिकांना मिळणार आहे.
क्लाउड आधारित १९३० सायबर हेल्पलाइनमुळे जलद प्रतिसाद आणि स्मार्ट पोलिसिंग अधिक प्रभावी होणार आहे.
‘सायबर सुरक्षित गोवा’ हे उद्दिष्ट ठेवून राज्य सायबर सुरक्षेत राष्ट्रीय बेंचमार्क निर्माण करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
पणजी : पुढारी वृत्तसेवा
सायबर सुरक्षेसाठी राज्यात लवकरच झिरो ई एफआयआर पद्धत लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. त्यांनी सांगितले की, सायबर सुरक्षेमध्ये गोवा अभिमानाने राष्ट्रीय बेंचमार्क स्थापित करतो.
क्लाउड आधारित १९३० सायबर हेल्पलाइनसह, जलद प्रतिसाद, १०० टक्के जबाबदारी आणि स्मार्ट पोलिसिंग आता वास्तव आहे. डॉ. सावंत यांनी सांगितले की, १ लाख रुपयांपर्यंतच्या सायबर फसवणुकीसाठी त्वरित ई- एफआयआर नोंदवण्याची सुविधा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. नागरिकांसाठी स्मार्ट पोलिसिंग, सायबर सुरक्षित गोवा हे आमचे लक्ष्य आहे.