GOA : ‘गोवा फॉरवर्ड’ मडगावात उतरणार 
गोवा

Goa Politics | काँग्रेस-गोवा फॉरवर्डमधील वाद वाढला

Goa Politics | काँग्रेसने स्पष्टीकरण देण्याची दुर्गादास कामत यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी एका खाजगी चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई हे जुडास व फिक्सर असल्याचे विधान केले केले होते.

त्यामुळे गोवा फॉरवर्ड पक्षासह सरदेसाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा वाद आता आता फोंड्यात पोहोचला आहे. गोवा फॉरवर्डचे संघटन सचिव दुर्गादास कामत यांनी काँग्रेसचे नेते राजेश वेरेकर व उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांची भेट घेऊन आलेमाव यांच्या विधानबद्दल नाराजी व्यक्त करत सदर वक्तव्यावर काँग्रेसने स्पष्टीकरण देण्याची मागणी केली.

कामत म्हणाले की, पोट निवडणुकीच्या तोंडावर आमच्या अध्यक्षाला आणि आमदाराला घातकी आणि फिक्सर म्हणून विरोधी पक्षनेत्यांनी त्यांचा अपमान केलेला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने याबाबत स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे.

जोपर्यंत स्पष्टीकरण दिले जात नाही, तोपर्यंत पक्ष पोटनिवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याचे कामत यांनी सांगितले. सोमवारी गोवा फॉरवर्डच्या कार्यकारिणी समितीची बैठक होणार असून त्या बैठकीमध्ये पोट निवडणुकीत पक्षाने काय भूमिका घ्यावी, याबाबत चर्चा होणार असल्याचेही कामत यांनी सांगितले.

गोवा फॉरवर्डचा पाठिंबा आवश्यक: वेरेकर

राजेश वेरेकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यासाठी विजय सरदेसाई आणि त्यांच्या पक्षाने मोठी भूमिका बजावली होती. त्यामुळे फोंडा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी गोवा फॉरवर्डचा पाठिंबा गरजेचे असल्याचे वेरेकर म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT