पणजी पुढारी वृत्तसेवा
गेल्यावर्षर्षीपेक्षा यंदा नगरनियोजन खात्यासाठी निधीत वाढ करण्यात आली असली गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पातील सुमारे ३.५ कोटी खर्च झाले नाही. किनारपट्टी व पर्यटन क्षेत्रातील कॅरियर कॅपिसीटीची मॅपिंग व्हायला हवे. या अर्थसंकल्पात प्रादेशिक आराखडा व बाह्यविकास आराखड्याचा कोणताच उल्लेख नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले.
गोवा वैद्यकीय महाविद्यालय, आरोग्य सेवा, मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्था, गोवा दंत महाविद्यालय, अन्न आणि औषध प्रशासन, नगर आणि देश नियोजन, नगरपालिका प्रशासन, महिला आणि बाल विकास, वन खात्यांवरील कपात मागण्यांना विरोध करताना आलेमाव बोलत होते. किनारपट्टी व पर्यटन क्षेत्रात कॅरियर क्षमतेची मॅपिंग व्हायला हवी.
कॅरियर क्षमता योग्यरित्या स्पष्ट व्हायला हये. केरळातील बायनाडसारखी स्थिती होण्यापूर्वी वेळीच पावले उचलण्यात यावीत. प्रादेशिक आराखडा हा २० से २५ वर्षासाठी व्हिजन डॉक्युमेंट असायला हवा. मात्र हा आराखड्यात बदल करण्यासाठी टीसीपी कायद्यात दुरुस्त्या करण्यात आल्या. १७ (२) फलम आणून चुका झाल्याच्या नावाखाली या आराखड्यातून वेगवेगळे झोनिंग करण्यात आले.
मोठया प्रमाणात हे बदल करण्यात आले. डोंगरकापणी व शेती भराव पालण्यास सुरुवात झाली. प्रादेशिक आराखडा हा गोव्याचे भविष्य होते मात्र कायद्यात दुरुस्ती करून आराखड्यात चुका झाल्याच्या नावाखाली जमीन रुपांतरण करण्यात आले च विध्वंस सुरू झाला आहे.
मायणा केपे येथे फिलोमिना रिप्लटी कंपनी ७.६० चौ. मी. जमिनीत डोंगरकापणी व झाडे कापून सपाटीकरण सुरू आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे १७ (२) व ३९ अ कलम रद्द करण्याची लोकांची मागणी असून त्यासाठी इनफ इज इनफ चळवळ सुरू झाली आहे. यासंदर्भात विधेयकेही सादर करण्यात आली आहेत ते बोले पोहचली आहेत त्याचा पत्ता नाही.
मडगाव कब्रस्थान प्रश्न सोडविला जाईल मात्र अजून वो होत नाही. गोमेकॉ इस्पितळावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा व शहरी आरोग्य केंद्रात आवश्यक सुविधा तसेच तज्ज्ञ डॉक्टर्सची उणीय आहे. कार्डिओलोजी डॉक्टर्स फक्त गुरुवारी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात येतो त्यामुळे रुग्णांनी त्या दिवसांपर्यंत वाट पाहायची का असा प्रश्न त्यांनी केला.
गोमेकॉ इस्पितळाकडे रुग्ण पाठवण्याची संख्या गेल्या अनेक वर्षात वाढत आहे. इस्पितळ व आरोग्य सेवा पुरेशा नाहीत. गोमेकॉ इस्पितळात शेजारील राज्यातूनही रुग्ण मोठ्या संख्येने येत असल्याने वा इस्पितळात मोठा ताण पड़त आहे, त्यामुळे त्याचा परिणाम जिल्ला व उपजिल्हा इस्पितळावर होत आहे. त्यामुळे स्थानिकांना प्राधान्य द्यायचे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कर्मचाऱ्यांची उणीव ही मोठी समस्या आहे. दंत इस्पितळ, आयपीएवबी, परिचारिका, अटेंडेंटची संख्या कमी आहे. गोमेकॉ इस्पितळाच्या विविध विभागात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. परिचारिका व स्वच्छता कर्मचारी सुमारे २०० कमी अधिक तर कर्मचारी हे वाळपईतून भरले गेले आहे.
सुपरस्पेशालिटीमध्ये ८०० पदे रिक्त
सुपरस्पेशिलीटी इस्पितळात सुमारे ८०० कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ते गोवा राज्य कर्मचारी निवड आयोग रद्द होण्याची वाट पाहत आहेत, का असा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.
प्रतिदिन कर्करोगग्रस्तांच्या चार केसेस
कर्करोगाची १४५ केसेस प्रतिमाह म्हणजे ४ केसेस प्रतिदिन नोंद होत आहेत. जिल्हा व उपजिल्हा इस्पितळांत महत्वाच्या उपकरणांची उणीव आहे. तंत्रज्ञान असले तरी डॉक्टर्स नाहीत. त्यामुळे त्याचा काहीच फायदा लोकांना होत नाहीः