Goa Assembly Election  Pudhari File Photo
गोवा

Goa Assembly Elections | भूमिका अजूनही गुलदस्त्यात; राजकीय इच्छाशक्ती मात्र 'जैसे थे'

Goa Assembly Elections | 'त्या' उमेदवारांच्या हाती कोणता झेंडा?

पुढारी वृत्तसेवा

पणजी : विठ्ठल गावडे पारवाडकर
विधानसभा निवडणूक आता सहा महिन्यांवर येऊन ठेपली असताना इच्छुक उमेदवारांची संख्याही वाढताना दिसत आहे. राज्यातील काही ठरावीक मतदारसंघांमध्ये असे नेते तथा उमेदवार आहेत की ते निवडणुका जवळ आल्यानंतर एखाद्या पक्षाची उमेदवारी घेऊन निवडणुका लढवतात. यातील बहुतांश उमेदवार पराभूत झाले आहेत.

तरी त्यांची निवडणुका लढवण्याची राजकीय इच्छाशक्ती 'जैसे थे' असते. यामध्ये साखळीतून धर्मेश सगलानी यांचे नाव घेता येईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विरोधात त्यांनी तीन निवडणुका लढवल्या. मात्र तिन्ही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. यावेळी पुन्हा चौथ्यांदा ते मुख्यमंत्र्यांसमोर काँग्रेसचे उमेदवार म्हणून उभे राहतात की काँग्रेस अन्य नेत्याला उमेदवारी देते ते पाहावे लागेल.


पर्ये मतदारसंघातील विश्वजित कृष्णराव राणे यांनीही भाजपच्या उमेदवारीवर दोन निवडणुका लढवल्या. परंतु ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांच्या विरोधात त्यांना यश आले नाही. २०२२ मध्ये डॉ. देविया राणे यांना भाजपने उमेदवारी दिल्याने विश्वजित कृ. राणे यांनी आम आदमी पक्षाची उमेदवारी स्वीकारली. पण त्यांच्या वाट्याला पराभवच आला. आगामी विधानसभा निवडणुकीत विश्वजित कृ. राणे हे उतरणार काय आणि उतरले तर कोणत्या पक्षाची उमेदवारी स्वीकारणार याकडे पर्येतील लोकांचे लक्ष लागले आहे.

वाळपई मतदारसंघातून सत्यविजय नाईक यांनी भाजपच्या उमेदवारीवर दोन वेळा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना टक्कर दिली. मात्र अपयशी ठरले. राणे भाजपात दाखल झाल्यानंतर २०२२ ची निवडणूक नाईक यांनी आपल्या उमेदवारीवर लढवली. मात्र त्यांना विजय मिळाला नाही. असे अनेक नेते तथा उमेदवार राज्यातील प्रत्येक मतदारसंघात असून, त्यांना आमदार व्हायचे आहे. त्यासाठी ते प्रत्येक निवडणुकीत उतरतात.


माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांच्या कन्या वालंका आलेमाव, काँग्रेस-आप-आणि आता पुन्हा काँग्रेस असा प्रवास केलेल्या ॲड. प्रतिमा कुतिन्द्हो, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, आपचे माजी राज्य प्रमुख एल्विस गोम्स आद्रींनी निवडणुका लढवल्या. परंतु अद्याप त्यांना विधानसभेत प्रवेश मिळाला नाही.

आपल्या पुत्रा आमदार व्हावा, असे माजी मंत्री आणि सांताक्रूझच्या माजी आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांना वाटत होते. शेवटी अनेक निवडणुकांत पराभूत झालेले त्यांचे पुत्र रुडॉल्फ फर्नांडिस २०२२ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर सांताक्रूझमधून जिंकले.

सध्या ते भाजपात आहेत. मात्र येत्या निवडणुकीत भाजप त्यांना उमेदवारी देईल की नाही हे सांगता येत नाही. माजी मंत्री हरिश उर्फ अण्णा झांट्ये यांनाही आपले पुत्र प्रवीण झांट्ये आमदार व्हावेत, असे वाटत होते. प्रवीण यांनीही अनेक निवडणुका लढवल्या होत्या.

जुझे फिलिप युतीच्या प्रतीक्षेत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे गोवा अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी वास्कोतून दोनवेळा निवडणूक जिंकली. त्यानंतर तीन निवडणुकांमध्ये ते पराभूत झालेत. येत्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती व्हावी आणि आपल्याला युतीची उमेदवारी दाबोळीतून मिळावी यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. असे अनेक उमेदवार असून, येत्या निवडणुकीत यातील

जुझे फिलिप युतीच्या प्रतीक्षेत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे गोवा अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी वास्कोतून दोनवेळा निवडणूक जिंकली. त्यानंतर तीन निवडणुकांमध्ये ते पराभूत झालेत. येत्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती व्हावी आणि आपल्याला युतीची उमेदवारी दाबोळीतून मिळावी यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. असे अनेक उमेदवार असून, येत्या निवडणुकीत यातील किती जण, कुठल्या पक्षाच्या उमेदवारीवर रिंगणात उतरतात ते पाहावे लागेल.

आमदारकीच्या प्रतीक्षेत असलेले काही चेहरे

ट्रोजन डिमेलो (साळगाव), विजय भिके, आशिष शिरोडकर, बाळू फडके (म्हापसा), जोसेफ सिक्वेरा (कलंगूट), ओलेन्सियो सिमॉईश (कुठ्ठाळी), जनार्दन भंडारी (काणकोण), राजेश वेरेकर (फोंडा), खेमलो सावंत (साखळी), विठू मोरजकर (पेडणे), प्रेमानंद नानोसकर (दाबोळी) यांचा इच्छुकांत समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT