चंचल कुमार 
गोवा

WAVES Film Bazaar 2026 Goa |सर्जनशील कल्पनांपासून जागतिक संधींपर्यंत

चंचल कुमार; गोव्यात वेव्हज फिल्म बाजार २०२६ सुरू

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

वेव्हज फिल्म बाजारच्या २० व्या आवृत्तीचे उद्घाटन शुक्रवारी (दि.२०) गोवा येथे झाले. यानिमित्ताने भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट उद्योगांमध्ये संबंध जोपासण्याचा दोन दशकांचा काळ पूर्ण झाला. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) आयोजित पाच दिवसांच्या या बाजारपेठेत चित्रपट निर्माते, लेखक, गुंतवणूकदार, वितरक आणि इतर व्यावसायिक एकत्र येऊन सहकार्याच्या संधी शोधणार असून सर्जनशील प्रकल्पांना जागतिक बाजारपेठेकडे नेणार आहेत.

२०४ प्रतिनिधींवरून २,५०० हून अधिक प्रतिनिधींपर्यंत प्रवास माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी फिल्म बाजारच्या उल्लेखनीय वाढीवर प्रकाश टाकला. २००७ मध्ये १८ देशांतील २०४ चंचल कुमार प्रतिनिधींपासून सुरू झालेला हा प्रवास अलीकडच्या आवृत्त्यांमध्ये २,५०० हून अधिक प्रतिनिधींपर्यंत पोहोचला आहे. त्यांनी वेव्हज फिल्म बाजारला सर्जनशील संकल्पनेचे व्यावसायिक संधीत रूपांतर करणारे व्यासपीठ असे वर्णन केले.

वेव्हज २०२५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या 'क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर द वर्ल्ड' या संकल्पनेचा उल्लेख करून, भारतीय सर्जनशील प्रतिभेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठा आणि संधींमध्ये अधिक प्रवेश देण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. फिल्म बाजार हे सहकार्य आणि शोधाचे व्यासपीठ असून, जगभरातील चित्रपट निर्मात्यांनी या बाजारपेठेचा पुरेपूर उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.

महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर यांनी भारतीय चित्रपट निर्माते व्यावसायिकांना एकत्र आणण्यात फिल्म बाजारची अनोखी भूमिका अधोरेखित केली. आणि आंतरराष्ट्रीय हे व्यासपीठ चित्रपट निर्मात्यांशी त्यांच्या सर्जनशील प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर जोडले जाते, असे त्यांनी सांगितले. वेव्हज फिल्म बाजार चित्रपट पूर्ण होण्याची वाट पाहत नाही, तर चित्रपट निर्माता प्रक्रियेत ज्या टप्प्यावर असेल, तेथे त्याला भेटतो. चित्रपट निर्मात्याकडे अपूर्ण पटकथा असो किंवा प्रेक्षकांच्या शोधात असलेला पूर्ण चित्रपट असो, ही बाजारपेठ प्रकल्प पुढे नेण्यास मदत करू शकणाऱ्या लोकांना एकत्र आणते, असे त्यांनी सांगितले.

एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक धीरज सिंह यांनी सभेचे स्वागत करताना फिल्म बाजार हा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) अविभाज्य भाग असल्याचे सांगितले. गेल्या दोन दशकांपासून या व्यासपीठाने हे नाते कायम ठेवले आहे. फिल्म बाजार आता अधिक मोठे आणि व्यापक व्यासपीठ बनले असून, त्याची व्याप्ती आणि चित्रपट उद्योगासाठीच्या संधी वाढल्या आहेत, असे ते म्हणाले. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात यांनी आभार मानले. उद्घाटन समारंभाला एनएफडीसीचे अध्यक्ष जी. कृष्णकुमार हेही उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT