Water Crisis Pudhari
गोवा

Water Crisis | काणकोण पालिका क्षेत्रात 'पाणीबाणी'ची शक्यता

Water Crisis | ऐन दिवाळीत चावडी येथे मुख्य जलवाहिनी फुटल्याने मोठी समस्या; तात्काळ उपाययोजनेची गरज

पुढारी वृत्तसेवा

चावडी : पुढारी वृत्तसेवा
चावडी येथे नव्याने मासळी मार्केट बांधकामाच्या कामाकरिता खोदाईचे काम सुरू असून, जे.सी.बी. मशीनच्या सहाय्याने हे काम करीत असताना काणकोण रवींद्र भवन ते मासळी मार्केटपर्यंत आलेली मुख्य जलवाहिनी फोडण्यात आल्याने लाखो लीटर पाणी वाया जाण्याबरोबरच ऐन दिवाळीच्या दिवसांत पालिका क्षेत्रातील १२ ही प्रभागानी पाणी न मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नव्याने मासळी मार्केटच्या बांधकामाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी बांधकाम ठेकेदाराने पाणी पुरवठा विभागाची परवानगी घ्यायला हवी होती सुध्दा घेतलेली नाही असे पाणी पुरवठा विभागाचे अभियंते दिपराज नाईककर व प्रथमेश नाईक यांनी सांगितले.

बांधकाम करण्याकरिता त्यांनी पाणी पुरवठा विभागाकडे अर्ज केला असता तर पाण्याची जलवाहिनी कोठून गेली आहे याची त्यांना माहिती दिली असती असे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

२० हजार जनसंख्या अवलंबून

सुमारे २० हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा करणारी ही जलवाहिनी आज रात्रीपर्यंत दुरुस्त न केल्यास पालिका क्षेत्रातील नागरिकांना पाण्याकरिता हाल होण्याची शक्यता आहे. सदर जलवाहिनी ताबडतोब दुरुस्त करावी व जनतेला सुलभतेने पाणी मिळण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा विभागाने कार्य करावे अन्यथा पाणीपुरवठा विभागाला जाब विचारला जाईल, असा इशारा माजी नगराध्यक्ष अजय भगत यांनी दिला.

पोरतावाडा-शिवोलीत पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी

पोरतावाडा, शिवोली येथील पीर्ण अर्बन बँकेजवळ जलवाहिनी फुटल्याने गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे सतत वाहणारे पाणी रस्त्यावर साचून परिसराज रस्त्यावर पाण्याचे डबके निर्माण झाले आहेत.

या समस्येबबत संबंधित विभागाला तसेच अधिकाऱ्यांना अनेक दिवसांपूर्वी माहिती देण्यात आली आहे. मात्र, आठ ते दहा दिवस उलटूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

वाहनचालक, पादचाऱ्यांना त्रास

एकीकडे पाणीटंचाईच्या काळात पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना दुसरीकडे फुटलेल्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने या समस्येची तातडीने दखल घेऊन फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करावी आणि पाण्याची होणारी नासाडी थांबवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT