गोवा

Goa | वॉरेन आलेमाव, गिरीश चोडणकर यांची चौकशी

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार दाखल

पुढारी वृत्तसेवा

पणजी : हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये हालचाली तीव्र झाल्या असून, वॉरेन आलेमाव रविवारी पणजी पोलिस स्थानकात चौकशीसाठी हजर राहिले, तर काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांची म्हापसा पोलिसांनी तीन तास कसून चौकशी केली. सोशल मीडियावरील वक्तव्ये आणि व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर तक्रारी दाखल झाल्याने हे गुन्हे नोंदवले आहेत. वॉरेन आलेमाव यांनी हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत करणी सेनेचे नेते संतोष राजपूत यांनी पणजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

चौकशीस पूर्ण सहकार्य : चोडणकर

सरकार विरोधातील मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आणि आपला आवाज दडपण्यासाठी ही कारवाई केल्याचे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे. तक्रारदारांचे आभार मानत चोडणकर यांनी सांगितले की, प्रत्येक प्रश्नाचे मी सविस्तर उत्तर दिले असून चौकशीस पूर्ण सहकार्य केले आहे.

गोविंद शिरोडकर गैरहजर

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ता गोविंद शिरोडकर यांना म्हापसा पोलिसांनी समन्स बजावून आज चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र ते उपस्थित राहिले नाही, अशी माहिती म्हापसा पोलिस निरीक्षकांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT