गोवा

Goa Assembly Election | "वाळपईत विश्वजित राणे यांचा दबदबा राहणार कायम! विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती सज्ज"

Goa Assembly Election |सत्तरी तालुक्यावर राणे कुटुंबीयांचे वर्चस्व अनेक वर्षांपासून कायम आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

सत्तरी तालुक्यावर राणे कुटुंबीयांचे वर्चस्व अनेक वर्षांपासून कायम आहे. सत्तरीतील वाळपई व पर्ये या दोन्ही मतदारसंघांमध्ये सध्या विश्वजित राणे व डॉ. दिव्या राणे या आमदार असून येत्या निवडणुकीत भाजपला त्यांनाच उमेदवारी मिळेल, हे निश्चित असून वाळपईत विश्वजित राणे व पर्येत देविष्णे राणे यांचा दबदबा कायम राहील, असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

विश्वजित राणे यांच्या विरोधात कोण हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी सत्यविजय नाईक, मिलिंद प्रभू, मनीषा उसगावकर व रोशन देसाई यांची नावे चर्चेत आहेत. रोशन देसाई या काँग्रेस गट महिला प्रमुख आहेत.

मात्र, इतर तीन दावेदारांचे पक्ष सध्या तरी स्पष्ट झालेले नाहीत, कारण २०१२ व २०१७ ची निवडणूक भाजप व त्यानंतर २०२२ ची निवडणुकीत आपल्या उमेदवारीवर निवडणूक लढवलेले सत्यविजय नाईक हे त्यानंतर आपली संलग्न काँग्रेसच्या उमेदवारीवर लढवलेल्या मनीषा उसगावकर यांना पक्षाने निलंबित केलेले आहे. मिलिंद प्रभू हे पहिल्यांदाच राजकारणात उतरत आहेत. गेली दोन वर्षे ते उसगाव भागात सामाजिक काम करत आहेत. मात्र, ते अपक्ष लढणार की एखाद्या पक्षातून, हे पाहावे लागेल.

मनोज परब यांची मते कुणाला?

२०२२ च्या निवडणुकीचा विचार करता भाजप उमेदवार विश्वजित राणे यांना १४,४६२ मते मिळाली होती. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिवी मतदारसंघात राहणारे तेव्हाचे आरजीचे अध्यक्ष मनोज परब यांना दुसऱ्या क्रमांकाची तब्बल ६,३७७ मते मिळाली होती.

काँग्रेसला २,१०९, आपला २,५९९ मते मिळाली होती. मेळावलीच्या आयआयटी विरोधी आंदोलनाला आरजीने पाठिंबा दिल्यामुळे बाहेरचे उमेदवार असतानाही परब यांना ६,३७७ मते मिळाली होती. आता परब यांनी आरजी सोडलेली आहे. ते पुन्हा वाळपईत उभे राहण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे त्यांना मिळालेली मते कुठल्या उमेदवाराला मिळणार, हा प्रश्न उपस्थित झालेला आहे.

२०२५ जि.पं. निवडणूक (नगरगाव मतदारसंघ) निकाल

  • प्रेमनाथ दळवी (भाजप - विजयी): ११,३६१ मते

  • धुळू शेळके (अपक्ष): १,९९४ मते

  • नीलेश गावकर (आरजी): १०४७ मते

  • नंदकुमार कोपाडेकर (काँग्रेस): ४३५ मते

  • अर्जुन परब (आप): १५३ मते

जिल्हा पंचायतीचा विचार केल्यास वाळपई मतदारसंघांमध्ये वाळपई पालिका असल्याने नगरगाव हा एकमेव जि. पं. मतदारसंघ आहे. डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रेमनाथ दळवी हे भाजपचे उमेदवार म्हणून जिल्हा पंचायतीवर इतर उमेदवारावर सुमारे १० हजार मतांची आघाडी घेऊन जिंकले होते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT