विजय सरदेसाई  
गोवा

Vijai Sardesai Congress alliance delay |काँग्रेस युतीची बोलणी करण्यास वेळकाढूपणा करत असल्याने विजय सरदेसाई नाराज

काँग्रेस युतीची बोलणी करण्यास वेळकाढूपणा करत असल्याने विजय सरदेसाई नाराज

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

काँग्रेस युतीची बोलणी करण्यास वेळकाढूपणा करत असल्याने गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई नाखूश झाले आहेत. पणजी येथे शुक्रवारी बोलताना त्यांनी ही नाराजी व्यक्त केली.

सरदेसाई म्हणाले की, गोव्यातील लोकांच्या मागणीनुसार आम्ही विरोधकांनी एकत्र व्हायचे ठरवले होते, मात्र वारंवार आठवण करून देऊनही काँग्रेस पक्ष युतीची बोलणी करण्यास पुढाकार घेत नाही. त्यामुळे युती होणार की नाही, असा प्रश्न आपणास पडलेला असून काँग्रेस युतीबाबत काय निर्णय घेतो, याची प्रतीक्षा गोवा फॉरवर्ड करत आहे, असे सरदेसाई म्हणाले.

विजय सरदेसाई सगळे विरोधक काँग्रेस विरोधातील मुख्य पक्ष आहे, त्यामुळे विरोधकांचे नेतृत्व त्यानेच करावे, असे आपले विचार आम्ही गोवा फर्स्ट हा गट स्थापन केला होता, त्यामध्ये एकत्र यायचे होते, मात्र आपने काँग्रेस व भाजपा शिवाय विरोधकांनी एकत्र यावे असे सांगितले. त्यांच्या या मताशी आपण सहमत झालो नाही. कारण भाजपला आपला विरोध आहे, काँग्रेसला नाही.

काँग्रेस विरोधातील मुख्य पक्ष आहे, त्यामुळे विरोधकांचे नेतृत्व त्यानेच करावे, असे आपले विचार असल्यामुळेच आप सोबतची गोवा फर्स्ट गट आपण सोडला, असे सरदेसाई म्हणाले. विरोधकांच्या युतीचा चेंडू काँग्रेसच्या कोर्टात असून त्यांनी लवकर निर्णय घ्यायला हवा, असे सांगून काँग्रेसचे आमदार दोन वेळा मोठ्या प्रमाणात फुटले आणि भाजपला मिळाले. त्यामुळे तिसऱ्यावेळी ते फुटतील असे आपण यापूर्वी म्हटले होते, असे उत्तर एका प्रश्नावर बोलताना सरदेसाई यांनी दिले. गोवा फॉरवर्ड काँग्रेस सोबत युती करण्यास पुढे सरसावला आहे. मात्र, काँग्रेस काहीच हालचाल करत नाही, अशी खंत यावेळी सरदेसाई यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT