पणजी : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सव संपल्यामुळे बाजारात चिकन, मासे खाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर कमी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, दर अद्याप घटलेले नाहीत. बाजारात काही प्रमाणात नवीन कांदा उपलब्ध झाला असला तरी त्याचे दर चढेच आहेत. कांदा, मिरची, लसूण आणि आल्याच्या दरवाढीमुळे स्वयंपाकघरातील हिरवा मसाला आणखी तिखट झाला आहे.
पणजी बाजारात नवीन कांदा ६५ ते ७० रुपये, तर जुना कांदा ८० रुपये किलो होता. बटाटा ५०, तर टोमॅटो ४० रुपये किलो होता. लसणाचे दरही वाढले असून, आकारानुसार तो ५०० ते ६०० रुपये किलो झाला आहे. आल्याचा दर ३०० रुपये किलो झाला आहे. पुढील काही दिवस ही दरवाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
पणजी मार्केटमधील भाज्यांचे दर (रुपयांत) -
कांदा - ६५ ते ८०, बटाटा - ५०, टोमॅटो - ४०, मिरची - १००, ढब्बू मिरची - १०० ते १२०, वालपापडी - ९० ते १२०, गवार - ८०, कोथिंबीर - २०, वांगी - ६० ते ८०, गाजर - ८०, कारली - ८०, बीट - ८०, मटार - १५० ते १८०, दोडका - १००, भेंडी - ८०, कोबी - ४० (नग), फ्लॉवर - ५० (नग), दुधी भोपळा - ५० (नग), चिबुड - २०० ते ३०० (नग), निरफणस - १५० ते ३०० (नग), नारळ - ३० ते ६० (नग), मेथी - २५ (जुडी), शेपू - २५ (जुडी), पालक - २० (जुडी), कोथिंबीर - २०
फलोत्पादनकडे कांदा ५७ रुपये किलो:
फलोत्पादन मंडळाच्या गाड्यांवर मात्र भाज्यांचे दर कमी आहेत. भेंडी ४५, कोबी २६, फ्लॉवर ३२ रुपये प्रति नग, गाजर ४३, वालपापडी ६०, मिरची ५४, कांदा ५७, बटाटा २७, तर टोमॅटो २८ रुपये किलो होता.