Law Pudhari
गोवा

Margao Accident News| दुचाकी अपघात प्रकरणी अनिकेत सिंग दोषी; जखमीला मदत न करता घटनास्थळावरून पळाल्याचा ठपका

Margao Accident News| मडगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तिसऱ्या अतिरिक्त न्यायालयाने १३ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या रस्ते अपघाताच्या प्रकरणात अनिकेत सिंग याला दोषी ठरवले आहे.

पुढारी वृत्तसेवा

सासष्टी: मडगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तिसऱ्या अतिरिक्त न्यायालयाने १३ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या रस्ते अपघाताच्या प्रकरणात अनिकेत सिंग याला दोषी ठरवले आहे. सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अनिकेत सिंग हा होली स्पिरिट चर्चकडून मडगाव मार्केटच्या दिशेने जाताना अॅक्टिव्हा स्कूटर निष्काळजीपणे भरधाव वेगाने चालवत होता.

जेव्हा तो मडगाव येथील जुन्या हॉस्पिसिओ हॉस्पिटलजवळ, बेबी लैंड केजी स्कूलजवळ पोहोचला, तेव्हा त्याने एका एव्हिएटर स्कूटरला उजव्या बाजूला फूटरेस्टजवळ धडक दिली. फिर्यादी किशोर प्रभुदेसाई यांनी उजवीकडे वळण्याचा इशारा दिला होता. ते उजवीकडे वळण्याचा प्रयत्न करत होते.

धडकेमुळे ते रस्त्यावर पडून त्यांच्या उजव्या पायाला, गुडघ्याला आणि हाताला दुखापत झाली. अपघात घडवल्यानंतर, आरोपी जखमीला वैद्यकीय मदत न देता आणि पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पळून गेला. आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम २७९ आणि ३३८ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४(अ) आणि १३४ (ब) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT