Arrested Pudhari
गोवा

Colvale Goa Murder Case | चिखली खूनप्रकरणी दोघांना अटक

Colvale Goa Murder Case | चिखली-कोलवाळ येथे पूर्ववैमनस्यातून झालेल्या खूनप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी ख्रिस्तोफर पॉल रा. चिखली) आणि प्रतीक गावस (रा. नादोडा) यांना अटक केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा

चिखली-कोलवाळ येथे पूर्ववैमनस्यातून झालेल्या खूनप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी ख्रिस्तोफर पॉल रा. चिखली) आणि प्रतीक गावस (रा. नादोडा) यांना अटक केली आहे. न्यायालयाने दोघांनाही आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून अन्य दोन संशयित अद्याप फरार आहेत.

२४ जून रोजी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास कृष्णा आबुलो (शंभू) नाईक (वय ६०) यांच्यावर चार युवकांनी हल्ला केला होता. संशयित मानशेर परिसरात सांजाव साजरा करण्यासाठी गेले होते.

तेथून परतताना दारूच्या नशेत त्यांची कृष्णा नाईक यांच्याशी भेट झाली. ख्रिस्तोफर पॉल आणि त्याचा भाऊ यांच्यातील पूर्वीच्या वादातून संशयितांनी कृष्णा नाईक यांना अडवून दांडुक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या त्यांच्या चुलत भावालाही मारहाण करण्यात आली.

गंभीर जखमी झालेल्या कृष्णा नाईक यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरुवातीला पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा नोंदवला होता; मात्र मृत्यूनंतर त्याचे रूपांतर खुनाच्या गुन्ह्यात करण्यात आले. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक हरीश मडकईकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, फरार आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणाचा पुढील तपास कोलवाळ पोलिस निरीक्षक संजीत कांदोळकर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT