Porvorim Flyover Project  pudhari photo
गोवा

Porvorim Flyover | पर्वरी उड्डाणपूल उद्घाटनासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल

Porvorim Flyover | मुंबई-गोवा महामार्गावरील पर्वरी फ्लायओव्हर सुरू होणार; वाहतूक पोलिसांकडून पार्किंग प्लॅन जाहीर

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वर पर्वरी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. या पार्श्वभूमीवर गोवा वाहतूक पोलिसांनी विशेष वाहतूक व पार्किंग व्यवस्था जाहीर केली आहे.

उद्घाटनाचा कार्यक्रम पणजी-म्हापसा महामार्गावरील उड्डाणपुलावर होणार आहे. कार्यक्रमाला येणाऱ्या व्हीआयपींना हॉटेल निओ मॅजेस्टिकच्या बाजूने प्रवेश दिला जाणार आहे. सर्वसामान्यांना गिरी बाजूच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करता येणार आहे. व्हीआयपी वाहनांसाठी पणजी-म्हापसा कॅरेजवेच्या डाव्या बाजूस नव्या उड्डाणपुलावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

इतर व्हीआयपी वाहनांसाठी आझाद भवन व गाडगे महाराज हॉल परिसरात पार्किंगची सुविधा असेल. सर्वसामान्यांच्या वाहनांसाठी उड्डाणपुलाजवळील अमनोरा इमारतीजवळ पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळापर्यंत ये-जा करण्यासाठी शटल बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT