goa news
थिवी बालगृहातील मुलींच्या अपहरणप्रकरणी दोघे अटकेत pudhari photo
गोवा

थिवी बालगृहातील मुलींच्या अपहरणप्रकरणी दोघे अटकेत

पुढारी वृत्तसेवा

म्हापसा : थिवी येथील बालगृहातील दोन अल्पवयीन मुलींच्या अपहरणप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी अरबाज खान (२० वर्षे, रा. शेळपे, धुळेर) व शबीर बेतागिरी (२६ वर्षे, ताळगाव, पणजी) या दोघांना अटक केली आहे. अपहरणासाठी वापरण्यात आलेली कारही जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जुलै रोजी माडेल, थिवी येथील नवज्योती चिल्ड्रन्स होम येथून १३ व १४ वर्षांच्या मुलींना पळवून नेल्याची तक्रार अॅनी मॅथ्यू कुंचेराकट्ट यांनी ६ जुलै रोजी कोलवाळ पोलिस स्थानकात दिली होती. त्यानुसार कोलवाळ पोलिसांनी भारतीय न्याय संहिता १३७ (१) कलमांतर्गत गुन्हा नोंद करून तपास केला.

अवघ्या काही तासांत दोन्ही अल्पवयीन मुलींना कोणताही मोबाईलचा संपर्क नसताना म्हापसा येथून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या मुलींची रवानगी अपना घरमध्ये करण्यात आली आहे.

कोलवाळ निरीक्षक विजय राणे यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणी त्या अल्पवयीन युवतींना पळवून नेणाऱ्या अरबाज खान व शब्बीर बेतागिरी या दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. अपहरणासाठी त्यांनी वापरलेली जीए ०९, ३६१९ या क्रमांकाची कार जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल, उपअधीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

SCROLL FOR NEXT