आष्टा हादरले! मारहाणीत 40 वर्षीय व्यक्तीचा खून pudhari photo
गोवा

Kelshi Goa Crime News | गोव्यात खळबळ! केळशीत 64 वर्षीय व्यक्तीचा विहिरीत मृतदेह; गळ्याला दोरी आणि खुर्चीमुळे खुनाचा संशय

Kelshi Goa Crime News | पोलिसांनी सध्या 'अनैसर्गिक मृत्यू' म्हणून प्रकरणाची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

केळशी येथील एका विहिरीत ६४ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून, त्यांच्या गळ्याला दोरी गुंडाळलेली होती. तियोफिल कार्दोज असे मृताचे नाव असून, या प्रकरणी खुनाचा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी सध्या 'अनैसर्गिक मृत्यू' म्हणून प्रकरणाची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तियोफिल कार्दोज यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी त्यांच्या घराजवळील विहिरीत आढळून आला. मृताच्या गळ्याला दोरी अडकलेली होती, तसेच विहिरीत एक खुर्चीही सापडली आहे.

कार्दोज यांचा मृतदेह विहिरीत असल्याचे दिसताच स्थानिकांनी तातडीने कोलवा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले.

गळ्यातील दोरी आणि विहिरीत आढळलेली खुर्चीमुळे हा घातपात असण्याची शक्यता स्थानिक व्यक्त करत आहेत. मृत कार्दोज हे आपल्या बहिणीसोबत राहत होते. त्यांच्या घरात गेल्या काही दिवसांपासून इतरही काही व्यक्तींचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे.

कोलवा पोलीस निरीक्षक डायगो ग्रेसिअस यांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व तांत्रिक बाबींचा विचार करून मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास केला जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT