Purvacharya Devasthan : श्री पुर्वाचार्या देवस्‍थानची संरक्षक भिंत कोसळली, रस्‍त्‍यावरील वाहतूक बंद File Photo
गोवा

Purvacharya Devasthan : श्री पुर्वाचार्या देवस्‍थानची संरक्षक भिंत कोसळली, रस्‍त्‍यावरील वाहतूक बंद

सुदैवाने रस्‍त्‍यावर रहदारी कमी होती. स्‍थानिकांनी रस्‍ता रहदारीसाठी मोकळा केला.

पुढारी वृत्तसेवा

The protective wall of Shri Purvacharya Devasthan collapsed, traffic on the road closed

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात सध्या पावसाने जोर धरल्याने सगळीकडे पडझड होत आहे. श्री पुर्वाचार्या देवस्थानची भली मोठी संरक्षक भिंत आज सकाळी ६.४५ वाजता रस्त्यावर कोसळली. रस्ता मातीच्या ढिगाऱ्याखाली गेला, त्यामुळे रहदारी दोन्ही बाजुंनी बंद झाली. सुदैवाने यावेळी रस्त्यावर रहदारी कमी होती.

यावेळी बांदोड्याचे सरपंच रामचंद्र नाईक, स्थानिक पंच सदस्या मुक्ता नाईक, सागर मुळवी, जयराज नाईक, दिनेश वळवईकर व स्थानिकांनी मातीचा ढिगारा, चीरे बाजूला करून रहदारीस रस्ता मोकळा करून दिला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT