गोवा

पणजी: राष्ट्रपतींच्या हस्ते नव्या राजभवनाची आज पायाभरणी

Shambhuraj Pachindre

पणजी : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रपती रामनाथ कोविंद मंगळवारी दुपारी राज्यात दाखल झाले. नौदलाच्या आयएनएस हंस तळावर राज्यपाल श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, सभापती रमेश तवडकर आणि शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्होही उपस्थित होते. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज ( बुधवार) सकाळी 10 वाजता दोनापावला येथील राजभवनाच्या आवारामध्ये नव्या राजभवनाची पायाभरणी होणार आहे. जुनी इमारत तशीच ठेवून शेजारीच नवीन राजभवन बांधण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT