Subhash Phaldessai:  Pudhari Photo
गोवा

Subhash PhalDesai | "पक्ष सांगेल तिथून निवडणूक लढणार!" आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मंत्री सुभाष फळदेसाई यांचे मोठे विधान

Subhash PhalDesai | मंत्री सुभाष फळदेसाई : मी केपेचा ; पण सांगेतून जिंकलो

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

भारतीय जनता पक्षाचा आपण शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे. गेली ३५ वर्षे भाजपचे काम करत आहे. केपेतून पंच म्हणून निवडून आलो. जि. पं. सदस्य म्हणूनही केपेतूनच जिंकलो; पण पक्षाने आपणास सांगेतून निवडणूक लढवण्यास सांगितले. आपण पक्षाच्या आदेशानुसार सांगेतून लढलो व जिंकलो.

आता मंत्री आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत पक्ष जैसा आदेश देईल तेथून आपण निवडणूक लढवणार आहे, असे समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी स्पष्ट केले.
पर्वरी येथील सचिवालयात गुरुवारी पत्रकारांनी फळदेसाई यांना येत्या निवडणुकीबद्दल विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

सांगे मतदारसंघ एसटीसाठी आरक्षित झाल्यास पक्षाच्या सूचनेनुसार आपण जाईन, पक्ष सांगेल त्या ठिकाणाहून आपण निवडणूक लढवण्यास तयार आहोत. कारण आपण केवळ आमदार होण्यासाठी नाही तर लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आल्याचे फळदेसाई म्हणाले.

राज्यात मुबलक जलसाठा : सुभाष फळदेसाई:

राज्यात मुबलक जलसाठा आहे, अशी ग्वाही देत पेयजल खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले की, पुढील मे ते जूनपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत ठेवू, गोवेकरांनी पाऊस कमी झाला म्हणून भियाचे कारण नाही. राज्यात यंदा पाऊस कमी झाला असला तरी राज्यातील धरणात मुबलक जलसाठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरू नये.

मात्र प्रत्येकाने पाण्याचा जपून वापर करण्याची सवय लावावी. सरकारच्या जलस्रोत व पेयजल खात्याकडून पाण्याचे योग्य नियोजन केले जात आहे. पुढील पावसाळ्यापर्यंत नागरिकांना पाण्याची कमतरता पडू नये याचे नियोजन आपले खाते करील, असे फळदेसाई यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT