श्रीनिवास नायक 
गोवा

Srinivas Nayak Firing Case | दोन दिवस उलटले तरी हल्लेखोर बेपत्ता श्रीनिवास नायक गोळीबार प्रकरण

Srinivas Nayak Firing Case | पर्वरीतील लिओ मॅजेस्टिक कॅसिनोच्या पार्किंग परिसरात संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर झालेल्या गोळीबार घटनेला दोन दिवस उलटून गेले तरी अजूनही गोवा पोलिसांच्या हाती काहीच ठोस पुरावे लागलेले नाही.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पर्वरीतील लिओ मॅजेस्टिक कॅसिनोच्या पार्किंग परिसरात संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर झालेल्या गोळीबार घटनेला दोन दिवस उलटून गेले तरी अजूनही गोवा पोलिसांच्या हाती काहीच ठोस पुरावे लागलेले नाही. या तपासाकामासाठी स्थापन केलेली पोलिस पथके मुंबईला रवाना झाली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना व्यावसायिक वादातून घडली असल्याचा संशय व्यक्त करून त्या दिशेने तपास सुरू आहे. पूर्वनियोजन व सुपारी देऊनच हा हत्येचा कट रचण्यात आला होता, असे प्रथमदर्शनी समोर येत आहे. परंतु त्याची पडताळणी सुरू आहे.

पर्वरी घटनास्थळावरून हल्लेखोर गोव्यातून काही तासातच पसार झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोरांचे चेहरे अस्पष्ट दिसत असल्याने तपासकामाला गति मिळत नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

श्रीनिवास नायक यांच्यावर हल्लेखोरांनी जवळून पिस्तुलाने गोळीबार केला. मात्र त्यांचा नेम चुकल्याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हल्लेखोरांनी हा गोळीबार नायक यांना धमकी देण्यासाठी जाणूनबुजून नेम चुकवून केला होता की काय, या दिशेनेही चौकशी केली जात आहे. नायक यांना यापूर्वी धमकीचे फोन आले होते काय, त्याचीही माहिती पोलिस सध्या जमा करत आहेत.

संभाव्य ठिकाणी शोधमोहीम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी घटनेनंतर फरार झाले असून, त्यांच्या हालचालींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तपास पथकाने मुंबईकडेही मोर्चा वळवला असून, आरोपींच्या संभाव्य ठिकाणांची माहिती घेऊन शोधमोहीम राबवली जात आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील हल्लेखोरांची छायाचित्रे शेजारील राज्यांच्या पोलिसांकडे पाठवून त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT