coal scam file photo
गोवा

Coal Transportation | राज्यात कोळसा वाहतुकीला वेग ; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ

Coal Transportation | होस्पेट, बेल्लारीतील उद्योगांना रेल्वेतून पुरवला जातोय कोळसा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या सहा महिन्यांत दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हद्दीत कोळसा वाहतुकीत गतवर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ११.४ टक्क्यांनी वाढ झाली. या कालावधीत रेल्वेने ५.३६ दशलक्ष टन कोळशाची वाहतूक केली. मुरगाव बंदरात उतरविलेला कोळसा रेल्वेमार्गे होस्पेट आणि बेल्लारीतील उद्योगांना पुरविला जातो.

सप्टेंबरमध्येही कोळसा वाहतुकीत लक्षणीय वाढ झाली. सप्टेंबर २०२६ मध्ये दक्षिण पश्चिम रेल्वेने ०.९० दशलक्ष टन कोळशाची वाहतूक केली. सप्टेंबर २०२५ च्या तुलनेत ही वाढ २०.८ टक्के आहे.
एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत दक्षिण पश्चिम रेल्वेने एकूण २६.१ दशलक्ष टन मालवाहतूक केली. गतवर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात ५.८ टक्के वाढ झाली. मालवाहतुकीत लोहखनिजाचा सर्वाधिक वाटा असून, या कालावधीत १०.१७ दशलक्ष टन लोहखनिजाची वाहतूक झाली.

त्यात ४.७ टक्के वाढ झाली. पिग आयर्न व तयार पोलादाची ५.९५ दशलक्ष टन वाहतूक झाली असून, त्यात १०.५ टक्के वाढ नोंदली गेली. सप्टेंबरमध्ये एकूण मालवाहतूक ४.४१ दशलक्ष टनांवर पोहोचली. मागील वर्षाच्या ४.१७ दशलक्ष टनांच्या तुलनेत ही वाढ ५.९ टक्के आहे. इतर साहित्यात २० टक्के, खनिज तेलात १५.९ टक्के, कंटेनर वाहतुकीत १३.४ टक्के, सिमेंटमध्ये १८.२ टक्के आणि अन्नधान्य वाहतुकीत ८९.४ टक्के वाढ झाली.

रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ:

मालवाहतुकीतील वाढीचा परिणाम रेल्वेच्या उत्पन्नावरही झाला. सप्टेंबरमध्ये दक्षिण पश्चिम रेल्वेला मालवाहतुकीतून ४६५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत त्यात ३७.२८ कोटी रुपये म्हणजेच ८.७२ टक्के वाढ झाली. एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत मालवाहतूक उत्पन्न २,९४६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT