Smart Meter Pudhari
गोवा

Goa Smart Meter Project | स्मार्ट मीटर प्रकल्प रातोरात रद्द करता येणार नाही; वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची स्पष्ट भूमिका

Goa Smart Meter Project | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वीच प्रकल्प स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजी (पुढारी वृत्तसेवा):

स्मार्ट मीटर प्रकल्प रातोरात रद्द करता येणार नाही. प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्यातील सर्व अटी, करारातील तरतुदी आणि अन्य बाबींचा सखोल आढावा घेणे आवश्यक आहे, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले. स्मार्ट मीटर प्रकल्प सध्या स्थगित ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वीच प्रकल्प स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रकल्पाबाबतचा पुढील निर्णय सर्व संबंधित बाबींचा विचार करूनच घेतला जाईल, असे ढवळीकर यांनी सांगितले.

तरतुदींचा आढावा घेऊनच निर्णय

केवळ काँग्रेस किंवा अन्य कोणत्याही राजकीय पक्षाच्या मागणीवरून स्मार्ट मीटर प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रकल्पाशी संबंधित करार आणि त्यातील अटी तपासणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

भविष्यातील तांत्रिक प्रगती लक्षात घेता गोव्याने आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी तयार राहणे गरजेचे आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससह (एआय) आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना राज्यानेही या प्रगतीशी जुळवून घेतले पाहिजे, अशी भूमिका ढवळीकर यांनी मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT