पणजी : पुढारी वृत्तसेवा
मराठी राजभाषेला आपला वैयक्तिक पाठिंबा आहे. मात्र तिला करण्याबाबतच्या निर्णय सरकारला घ्यायचा आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली आहे. श्रीपाद नाईक राजभाषा मराठी राजभाषा निर्धार सोमवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपने निवडणुकीपूर्वी अनेक वेळा मराठी राजभाषा करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले होते.
डिसेंबरपर्यंत मराठी राजभाषा न केल्यास मराठीप्रेमी भाजप विरोधात मतदान करतील, असा इशारा दिला होता. या संदर्भात मंगळवारी पत्रकारांनी श्रीपाद नाईक यांना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. नाईक म्हणाले की, गोव्यात कोकणी सोबत मराठीही भाषा आहे. मराठीचा वापर गोव्यात अनेक वर्षांपसून होत आहे.
त्यामुळे आपला वैयक्तिक पाठिंबा मराठी राजभाषेसाठी आहे. मात्र वैयक्तिक पाठिंबा वेगळा व पक्षाचा पाठिंबा वेगळा आणि सरकारचा निर्णय वेगळा असतो. याबाबतचा निर्णय हा गोवा सरकारला घ्यायचा आहे. आपण कोणावर दबाव घालू शकत नाही, आपणाला पक्षाची धोरणे पाळावी लागतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सिद्धेश नाईक यांच्या उमेदवारीचा पक्ष निर्णय घेईल
श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिध्देश नाईक यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. त्या संदर्भात श्रीपाद नाईक यांना विचारले असता ते म्हणाले, सिद्धेश नाईक दोन वेळा जिल्हा पंचायतीवर निवडून आलेला आहे. त्याने पक्षासाठी व लोकांसाठी भरपूर काम केले आहे.
एखाद्या मतदारसंघातून उमेदवारीची अपेक्षा करणे यात गैर काही नाही. मात्र, उमेदवारीबाबतचा निर्णय पक्ष घेईल. या पक्षाच्या नेत्यांना सर्व गोष्टी माहीत आहेत. त्यामुळे आपण कुणावर दबाव घालण्याचीही गरज वाटत नाही, असे श्रीपाद नाईक यांनी सांगितले.