Mapusa Minor Girl Assault pudhari photo
गोवा

Mapusa Minor Girl Assault | घृणास्पद! म्हापसा बाजारपेठेत फुगे विकणाऱ्या गरीब कुटुंबातील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

Mapusa Minor Girl Assault | दिवाळीच्या रात्रीची घटना : गोमेकॉत उपचार सुरू

पुढारी वृत्तसेवा

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
दिवाळीच्या दिवशी म्हापसा शहरातील टॅक्सी स्थानकाजवळील एका जीर्ण इमारतीत तीन ते चार वर्षांच्या बालिकर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत जखमी झालेल्या बालिकेवर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) उपचार सुरू असून, तिचा प्रकृती स्थिर असल्याचे समजते. घटनेनंतर पसार झालेल्या संशयिताचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी, ८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ ते ९.३० या वेळेत हा प्रकार घडला. ३० ते ४० वयोगटातील अज्ञात व्यक्तीने बालिकेचे अपहरण करून तिला संबंधित जीर्ण इमारतीच्या पहिल्या मजल्यावर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. बालिकेचे कुटुंब म्हापसा बाजारपेठेत दिवाळीनिमित्त फुगे विकून उदरनिर्वाह करते.

अत्याचारानंतर बालिका रक्तबंबाळ अवस्थेत रडत इमारतीतून बाहेर आली. शेजारील मोटरचायक पायलट स्थानकावरील पायलटच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी बालिकेला कापडात गुंडाळले. पोलिसांनी तिला प्रथम म्हापसा जिल्हा इस्पितळात आणि नंतर गोमेकॉत दाखल केले.
घटनाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक अनंत गावकर, पोलिस अधीक्षक आशिष शिरोडकर आणि अधीक्षक राहुल गुप्ता यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

म्हापसा येथे तीन वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या धक्कादायक घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातील आरोपीला कोणत्याही परिस्थितीत कठोर कठोर शिक्षा मिळवून देण्याची भूमिका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे.

फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकानेही घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. म्हापसा पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा माग काढण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, घटनास्थळाजवळ व्यवसाय करणारे मोटरसायकल पायलट पुंडलिक यांनी सांगितले की, रात्रीच्या वेळी एक व्यक्ती बालिकेचा हात धरून तिला जबरदस्तीने ओढत नेताना दिलेली होती.

सुरवातीला ती व्यक्ती फुगे विकणाऱ्या कुटुंबातील नातेवाईक असावी, असा अंदाज आल्याने संशय आला नाही. मात्र, काही वेळाने इमारतीच्या मागून मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने सहकारी पायलटणे जाऊन पाहिले. त्यावेळी बालिका गंभीर आणि रक्तबंबाळ अवस्थेत बाहेर येत होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांना कळविल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT