Goa Shigmotsav 2026 
गोवा

Goa Shigmotsav 2026 | फोंड्यात ५ रोजी शिमगोत्सवाची धूम

अंत्रुज शिमगोत्सव समितीतर्फे आयोजन; म्हादोळ येथील देवी महालसेला आज नमन

पुढारी वृत्तसेवा

फोंडा : फोंडा तालुका अंत्रुज शिमगोत्सव समितीच्या यंदाच्या शिमगोत्सवात रोमटामेळ आणि चित्ररथ पथकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. यंदा तब्बल १६ रोमटामेळ पथके, १४ चित्ररथ आणि ५ लोकनृत्य पथकांनी सहभाग दर्शवला आहे. येत्या ५ रोजी फोंड्यात हा शिमगोत्सव राज्य सरकारच्या पर्यटन खात्याच्या सहकार्याने दरवर्षीप्रमाणे साजरा केला जाणार आहे. दरम्यान, रविवारी १ रोजी म्हादोळ येथील देवी महालसेला नमन घालण्यात येणार असल्याची माहिती आयोजन समितीतर्फे देण्यात आली.

फोंड्यात यासंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला शिमगोत्सव ट्रस्ट तसेच आयोजन समितीचे अध्यक्ष रितेश नाईक, समितीचे पदाधिकारी गुरुनाथ ऊर्फ भाई नाईक, हनुमंत नाईक, प्रकाश बाळवे, किरण नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.

येत्या ५ तारखेला फोंड्यातील शिमगोत्सवाला संध्याकाळी ४ वाजता प्रारंभ होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तिस्क - फोंडा येथून शिमगोत्सव मिरवणुकीला प्रारंभ होणार असून बसस्थानकावर शिमगोत्सव मिरवणुकीची सांगता होईल.

रोमटामेळ पथके फोंडा तिस्क - मडगाव रस्त्यावरून सुरु होणार असून फोंडा - दुर्भाट रस्त्यावरून चित्ररथ मिरवणुकीला प्रारंभ होईल. लहान तसेच मोठ्या गटांसाठी वेशभूषा स्पर्धाही होणार असल्याची माहिती दिली. अध्यक्ष रितेश नाईक यांनी सर्वांनी शिस्तीत या शिमगोत्सव मिरवणुकीत सहभागी व्हावे आणि यंदाचा हा शिमगोत्सव यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT