Shardiya Navratri Goa 2026  
गोवा

Shardiya Navratri Goa 2026 | शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ

Shardiya Navratri Goa 2026 | राज्यभरातील मंदिरे सजली : धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

शक्ती आणि भक्तीचा महासोहळा असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवार (दि. ११) पासून राज्यभर उत्साहात प्रारंभ झाला. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या या नऊ दिवसीय महोत्सवानिमित्त मंदिरे आणि घराघरांत देवी दुर्गेच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे.

रविवारी सकाळी विधिपूर्वक घटस्थापना करण्यात आली. काही मंडळांनीही मंडपांमध्ये देवीची प्रतिष्ठापना करून उत्सवाला सुरुवात केली. राज्यातील विविध मंदिरांमध्ये घटस्थापनेनंतर नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. दसऱ्यापर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

काही मंदिरांमध्ये पारंपरिक मखरोत्सावाला सुरुवात झाली असून, दांडिया आणि गरबा नृत्याचेही आयोजन करण्यात आले आहे. काही ठिकाणी रामलीलेचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त राज्यभरातील मंदिरांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. एकट्या फोंडा तालुक्यात तब्बल १९ मंदिरांमध्ये नवरात्रोत्सव साजरा केला जातो. येथील वैशिष्ट्यपूर्ण उत्सवांमुळे या काळात मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते.

नवरात्रोत्सावातील महत्त्वाच्या तिथी:

  • महाअष्टमी : १८ ऑक्टोबर

  • महानवमी व कन्यापूजन : १९ ऑक्टोबर

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घटस्थापना आणि शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात भाविक दुर्गासप्तशतीचे पठण, उपवास आणि अखंड दीपप्रज्वलन करून देवीची आराधना करणार आहेत. सार्वजनिक मंडपांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे राज्यभरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT