पणजी : महिला आणि बाल विकास संचालनालयातर्फे अल्प उत्पन्न असलेल्या गृहिणींसाठी आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेल्या गृह आधार योजनेचा गैरवापर झाल्याचे पडताळणी मोहिमेत स्पष्ट झाले आहे. सात सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी व 743 पती-पत्नींनी गृह आधारचा लाभ घेतला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत अपात्र ठरलेल्या 1,860 लाभार्थ्यांची पडताळणी सुरू करण्यात आल्याची माहिती एका अधिकार्याने दिली.
750 अपात्र लाभार्थ्यांपैकी सात लाभार्थी आणि 743 लाभार्थ्यांच्या पती-पत्नींना सरकारी कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांना लाभाची रक्कम जमा करण्यासाठी आधीच पत्रे जारी केली आहेत, असे अधिकार्याने सांगितले. 260 अपात्र लाभार्थ्यांकडून किंवा ज्यांचे पती-पत्नी सरकारी कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून 1.32 कोटींहून अधिक रक्कम वसूल करण्यात आली आहे.
या अपात्र लाभार्थ्यांना मिळणारे लाभ तात्काळ थांबवण्यात आले आहे. त्यांना योजनेच्या मंजुरीच्या वेळेपासून फॉर्म 16 किंवा वेतन स्लिप सादर करण्यास सांगण्यात आले. अपात्र म्हणून ओळखल्या गेलेल्या 1,100 लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह सूचनांचे पालन केले आणि या लाभार्थ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पुनर्तपासणी केल्यावर 350 लाभार्थी खरे असल्याचे आढळून आले असल्याचे त्यांनी सांगितले.