Digital Arrest Scam Pudhari
गोवा

Digital Arrest Scam | डिझिटल अरेस्टच्या भीतीने काणकोणमधील ज्येष्ठ नागरिकाला 42.60 लाखांचा गंडा

Digital Arrest Scam | गोव्यातील काणकोण तालुक्यातील एका ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला 'डिझिटल अरेस्ट'ची भीती दाखवून तब्बल ४२ लाख ६० हजार रुपयांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील काणकोण तालुक्यातील एका ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला 'डिझिटल अरेस्ट'ची भीती दाखवून तब्बल ४२ लाख ६० हजार रुपयांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गोवा सायबर पोलिसांनी कारवाई करत महाराष्ट्रातील नांदेड येथून तेजस नरहरे (वय २०) या युवकाला अटक केली आहे.

संशयित आरोपींच्या टोळीने दिल्ली दूरसंचार विभाग आणि मुंबई गुन्हे शाखेचे (Mumbai Crime Branch) अधिकारी असल्याचे भासवून वेगवेगळ्या पाच व्हॉट्सॲप क्रमांकांवरून पीडित ज्येष्ठ नागरिकाला फोन केले होते.

सायबर पोलिसांनी अज्ञात मोबाईलधारकांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता, फसवणुकीच्या रकमेतील १० लाख रुपये नांदेड येथील एका बँक खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले.

त्यापैकी ९ लाख ५० हजार रुपये धनादेशाद्वारे (Cheque) आणि ५० हजार रुपये एटीएम मशीनद्वारे काढण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले. पोलीस अधीक्षक राजू राऊत देसाई आणि उपअधिक्षक बी. व्ही. श्रीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नांदेड गाठले. तेथील स्थानिक भाग्यनगर पोलिसांच्या मदतीने आरोपी तेजस नरहरे याला अटक करून २१ तारखेला गोव्यात आणण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT