Mumbai Dengue Malaria Pudhari
गोवा

Goa Dengue | गोव्यात पावसाळ्याच्या तोंडावर डेंग्यूविरुद्ध युद्धपातळीवर तयारी! आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना तीव्र

Goa Dengue | डेंग्यू प्रादुर्भाव सुरू झाल्याने कार्यवाही

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पावसाळा आणि डेंग्यू प्रसाराचा हंगाम सुरू झाल्याने, आरोग्य सेवा संचालनालयाने या रोगाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न तीव्र केले. आरोग्य संचालनालयाच्या राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या (एनव्हीबी-डीसीपी) उपसंचालक डॉ. कल्पना महात्मे यांनी सांगितले की, आम्ही आरोग्य अधिकाऱ्यांना एका विशेष तयार केलेल्या नमुन्याद्वारे रुग्णांची दैनंदिन नोंद करण्यास सांगितले आहे.

डासांच्या प्रजननाची संभाव्य ठिकाणे नष्ट करण्यासाठी दर शनिवारी प्रादुर्भाव कमी करण्याची मोहीम राबवली जाते, डासांची घनता मोजण्यासाठी संबंधित निर्देशांकांची गणना करण्याचे निर्देश आरोग्य कर्मचाऱ्यांनाही देण्यात आले आहेत. जर निर्देशांक जास्त असतील, तर आरोग्य कर्मचाऱ्यांना स्रोतांची माहिती पुन्हा देण्यास सांगितले जाते.

यंदा जानेवारी ते मे या कालावधीत गोव्यात डेंग्यूचे १६ रुग्ण आढळले, तर २०२४ मधील याच कालावधीत ३३ रुग्ण आढळले होते. जर कीटकांची घनता नियंत्रणात आणली, तर रोगही नियंत्रणात येईल. म्हणूनच कीटकांची घनता कमी करण्यासाठी नियोजन केले आहे, असे डॉ. महात्मे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT