Save the God 
गोवा

Save the God | 'सेव्ह द गॉड' लघुपटातून युद्धाच्या क्रूरतेवर भाष्य; चिमुकल्याचा देवाला थेट सवाल!

Save the God | सेव्ह गॉड अर्थात देवाला वाचवा हा लघुपट खूप वर्षांपूर्वी सीरिया या देशात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

सेव्ह गॉड अर्थात देवाला वाचवा हा लघुपट खूप वर्षांपूर्वी सीरिया या देशात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. त्यावेळी सीरियावर बाँब स्फोट व हवाई हल्ले सुरू होऊन सर्वकाही बेचिराख होत होते. त्यात एका चार वर्षांचा मुलगा हवाई हल्ल्यात गंभीर जखमी झाला आणि लोकांनी त्याला रुग्णालयात नेले.

रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना, तो सतत रडत होता आणि त्याला आपला मृत्यू निश्चित वाटत आहे. असे तो म्हणत होता. त्याची आई हवाई हल्ल्यात मारली जाते. तिने सांगितले असते की चांगल्या व्यक्तीच्या मनात, काळजात देव राहतो. शरीर नष्ट होते आत्मा नाही, आपल्या विचारानुसार आपण घडतो.

मनाला व विचाराला नियंत्रित न केल्यास त्यांच्याकडून वाईट गोष्टी घडतात, दगडाने घर बांधता येते. तेच घर दगडाने तोडता येते, त्याच दगडाने जीव घेता येतो, जसा विचार तशी कृती घडते. अशी शिकवण त्याच्या आईची असते.

तो म्हणतो मी देवाला विचारीन, जर व्यक्तीच्या मनात व काळजात देव राहतो तर मग बाँब हल्ल्यात देवालाच मारण्याचा प्रयत्न होत नाही का, मग देवाला वाचवणे गरजेचे नाही का, हे हल्ले थांबवणे गरजेचे नाही का. असे अनेक प्रश्न तो विचारतो. तो देवासमोर येऊन काही साधे, पण मन हेलावून टाकणारे प्रश्न विचारतो. द्वेष, हिंसा, युद्ध आणि मानवतेच्या नैतिक अधःपतनाबद्दलचे प्रश्न.

'सेव्ह द गॉड' हा एका अवास्तव विश्वात घडणारा संवाद आहे, जो एका तरुण युद्धपीडिताचा आणि देवाचा आहे. हा संवाद श्रद्धा, विचारधारा आणि कट्टर मतांच्या नावाखाली केलेल्या युद्धगुन्ह्यांविषयी आहे, ज्यात स्त्रिया, मुले आणि निसर्ग हेच अंतिम बळी ठरतात. ही कथा एका लहान मुलाच्या निरागसतेतून सांगितली आहे, तिचा आवाज कोमल आहे; पण तिचा प्रभाव मात्र विनाशकारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT