Arrested Pudhari
गोवा

Satish Shinde Arrest | मुंबई विमानतळावरून दुबईला पळण्याच्या तयारीत असलेल्या सतीश शिंदेला अटक!

Satish Shinde Arrest | गोवा क्राईम ब्रांचची कारवाई : कटकारस्थानात सहभाग; पाच दिवसांची कोठडी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पर्वरी येथील निओ मॅजेस्टिक कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या गोळीबार कटकारस्थान प्रकरणी मुंबईच्या विमानतळावरून दुबईला जाणाऱ्या व्यावसायिक सतीश शिंदे या सहाव्या संशयिताला गोवा क्राईम ब्रांचच्या पथकाने अटक केली आहे. म्हापसा न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अटक असलेल्या संशयितांच्या चौकशीतून व्यावसायिक सतीश शिंदे याचे नाव समोर आले होते. त्यानुसार गोवा क्राईम ब्रांचने शिंदेला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले.

त्याला काल अटक करून गुरुवारी पोलिस रिमांडसाठी म्हापसा न्यायालयात उभे करण्यात आले. आतापर्यंत सात संशयितांना या गोळीबार प्रकरणात क्राईम ब्रांचने अटक केली आहे. त्यामध्ये शूटर्स संशयित अप्पुथराज उर्फ अण्णा नदार व बाबू अली तसेच संशयित पवन सौर, काझू शेख, इस्रार अली व सूरज आचार्य यांचा समावेश आहे.

संशयित आचार्य सतीश शिंदे त्याला न्यायालयात रिमांडसाठी नेण्यात आले तेव्हा त्याच्या वकिलांनी त्याची अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद केला. त्याला या प्रकरणात संशयितांच्या खोट्या जबानीच्या आधारे अटक केली आहे. त्याला मुंबईतून गोव्यात आणताना ट्रॅन्झिट वॉरंट घेण्यात आले नाही, तसेच त्याला बुधवारी सकाळी अटक केली

असतानाही त्याला गुरुवारी दुपारी अटक केल्याचे दाखवण्यात आले. त्याला २४ तासांनंतर न्यायालयात उभे करण्यात आले. त्याच्या अटकेची माहिती रिमांडला नेण्यापूर्वी देण्यात आली. त्यामुळे ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केला. सरकारी वकील तेजस चोडणकर यांनी संशयित सतीश शिंदे याचा पर्वरी गोळीबार प्रकरणातील कटात सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी तपासात आढळून आल्याने त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT