मडगाव : पुढारी वृत्तसेवा
दक्षिण गोव्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सासष्टी तालुक्याच्या मतदारांनी जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत दाखवलेला अल्प प्रतिसाद दिला. त्यामुळे सासष्टीच्या नऊ जिल्हा पंचायत मतदार संघात भाजप, काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्षाची कसोटी लागणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सासष्टी तालुका ताब्यात घेण्यासाठी भाजपचे कित्येक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या आमदारांनी केलेल्या पक्षांतरामुळे काही प्रमाणात भाजपाला जम बसवता आला होता. पण आगामी विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र आले होते.
त्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व इतर नेत्यांनी बराच जोर लावला होता. मात्र, मतदारांनी दिलेल्या अल्प प्रतिसाद पाहता सर्व पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे कष्ट घ्यावे लागणार असल्याचे चित्र आहे. सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीवर आणि विरोधकांच्या बदलाच्या हाकेवर जनता कोणाच्या बाजूने उभी राहणार हे सोमवारीच स्पष्ट होणार आहे.
विकासाच्या नावावर सत्ता टिकवण्याचा भाजपचा प्रयत्न आणि 'परिवर्तन हाच पर्याय असा विरोधकांचा सूर यामध्ये सासष्टी तालुक्यातील नऊ मतदारसंघ राजकीय रणांगणात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी मतदानाच्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत ४२.१४ टक्के मतदान झाले असून १,५९,१५२ पैकी ४४,३८६ मतदारांनी आपला कौल व्यक्त केला आहे.
मतदानाच्या आकडेवारीत गिरदोली ली मतदारसंघ आघाडीवर असून येथे ५०.५० टक्के मतदान नोंदले गेले आहे. याउलट नावेलीमध्ये केवळ ३८.४७ टक्के मतदान झाल्याने तेथे मतदारांचा प्रतिसाद तुलनेने कमी राहिला आहे. सकाळी मतदानाला काहीसे संथ चित्र दिसून आले. सकाळी दहा वाजेपर्यंत बहुतांश मतदारसंघांत १२ मी १६ टक्के मतदान झाले होते. मात्र दुपारी बारा वाजेपर्यंत हा टक्का २५ ते ३३ दरम्यान पोहोचला आणि त्यानंतर मतदानाचा वेग काहीसा वाढला.
दामूंच्या कामगिरीकडे लक्ष...
गेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार दिगंबर कामत यांच्याकडून भाजपला फार अपेक्षा होत्या. मात्र भाजपच्या पदरात फारसे काही लागले नाही. यावेळी माजी आमदार दामू नाईक यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. ते खुद्द सासष्टी तालुक्याचे रहिवासी असल्याने त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार दिगंबर कामत यांच्याकडून भाजपला फार अपेक्षा होत्या. मात्र भाजपच्या पदरात फारसे काही लागले नाही. यावेळी माजी आमदार दामू नाईक यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. ते खुद्द सासष्टी तालुक्याचे रहिवासी असल्याने त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.