पणजी : बर्च अग्निकांड प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हडफडे नागोवा पंचायतीचे अपात्र माजी रोशन रेडकर सरपंच यांना हणजूण पोलिसांनी अटक केली.
न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत या प्रकरणामध्ये हणजूण पोलिसांनी अटक केलेल्यांची संख्या १० झाली आहे. दरम्यान, याच प्रकरणात अटक करण्यात आलेले हडफडेचे बडतर्फ पंचायत सचिव रघुवीर बागकर यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने आणखी सात दिवसांची वाढ केली आहे. त्याना न्यायालयाने दिलेली ५ दिवसांची पोलिस कोठडी संपल्याने ती वाढवून देण्याची विनंती हणजूण पोलिसांनी केली होती.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान रेडकर यांच्यावर विविध गंभीर आरोप असून, या घटनेने कायदेशीर तसेच सार्वजनिक स्तरावर मोठे लक्ष वेधले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांनी न्यायालयासमोर हजर होत आत्मसमर्पण केल्याची माहिती सूत्रांनी दिली.