गोवा

मी विधानसभा निवडणूक लढवणार! ; रोहित मोन्सेरात

महापौरपदासाठी अर्ज दाखल; निवड निश्चित, उपमहापौरपदासाठी वसंत आगशीरकर यांचा अर्ज

पुढारी वृत्तसेवा

पणजी : आपण आगामी विधानसभा लढवणार आहे, अशी माहिती नगरसेवक तथा माजी महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिली. शुक्रवारी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते बोलत होते. महापौर म्हणून आपला कार्यकाळ अल्पकाळाचा राहणार असल्याचे सांगत पक्ष नेतृत्व उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, महापौरपदाचा कालावधी कमी असला, तरी शहराच्या विकासावर पूर्ण लक्ष केंद्रित केले जाईल. निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने काम केले जाईल, महापौरपदासाठी रोहित मोन्सेरात व उपमहापौर पदासाठी वसंत आगशीरकर यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. या पदांसाठीची निवडणूक ३० मार्च रोजी सकाळी ११ वा. होणार आहे.

२७ विरुद्ध ३ चे आहे बलाबल

मोन्सेरात आणि आगशीरकर यांची निवड निश्चित मानली जात आहे. निवडणुकीत मोन्सेरात गटाचे २७, तर उत्पल पर्रीकर गटाचे ३ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात अर्ज येण्याची शक्यता कमी असल्याने त्यांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT