Rohan khawante 
गोवा

Rohan Khaunte | सांस्कृतिक वारशाचे जतन करत गोव्यातील पर्यटनाला नवी दिशा देणार - पर्यटनमंत्री रोहन खंवटे

Rohan Khaunte | मंत्री रोहन खंवटे : खोतीगाव येथील मल्लिकार्जुन देवालयच्या नूतनीकरणाचा प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

चावडी : पुढारी वृत्तसेवा
सांस्कृतिक वारशाचे जतन करून पर्यटनाला नवी दिशा देण्याबरोबर ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणार, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. खोतीगाव अवे येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानाच्या नूतनीकरण व सुशोभीकरणाच्या कामाच्या शिलायासप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कला व संस्कृतीमंत्री रमेश तवडकर, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार केदार नाईक, पैंगीण जिल्हा पंचायत सदस्य अजय लोययेकर, खोतीगावचे सरपंच जयेश गावकर, देवस्थानचे अध्यक्ष साहिल देसाई, पर्यटन खात्याचे अधिकारी कुलदीप आरोलकर व प्रकाश पै, देवस्थानचे पुजारी बाबू भट पिगे आणि कृष्णा वेलीफ यांच्यासह स्थानिक उपस्थित होते.

ग्रामीण भागातील देवस्थाने, मंदिर आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन केल्यास पर्यटनाला नवी दिशा मिळू शकते, असे खंवटे म्हणाले. अशा स्थळांच्या विकासामुळे पर्यटकांना गोव्याच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरांची ओळख होईल. तसेच स्थानिकांना पर्यटनाशी संबंधित विविध व्यवसायांच्या संधी उपलब्ध होतील. गृह-निवासासारख्या उपक्रमांतून पर्यटकांना स्थानिक जीवनशैलीचा अनुभव घेता येईल आणि ग्रामस्थांना उत्पन्नाची साधने मिळतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक आणि आध्यात्मिक पर्यटनणाला चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागातील मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळांचे नूतनीकरण करून त्यांचे पर्यटनदृष्ट्या महत्त्व वाढविण्यावर भर दिला जात आहे. अशा प्रकल्पांमुळे स्थानिक वारशाचे जतन होण्याबरोबरच ग्रामीण भागाला आर्थिक लाभ मिळू शकतो, असे केदार नाईक यांनी सांगितले.

बाबू भट पिगे आणि कृष्णा वेलीफ यांनी धार्मिक विधी पूर्ण केले. देवस्थानचे अध्यक्ष साहिल देसाई यांनी स्वागत केले. परेश देसाई, कृष्णा देसाई, बाबू भट, अशोक देसाई, राम वेलीफ, ब्रिजेश देसाई, आनंदू देसाई, जिवानंद देसाई, पुरुषोत्तम देसाई यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. खोतीगावचे माजी सरपंच आनंद देसाई यांनी देवस्थानचा प्राचीन इतिहास सांगितला. रामचंद्र देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

हनी गार्डनसारखे उपक्रम राबवणार : तवडकर
मंत्री रमेश तवडकर यांनी खोतीगावची सामाजिक व सांस्कृतिक जडणघडण जपत स्थानिकांना कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात असल्याचे सांगितले. यासाठी हनी गार्डनसारखे उपक्रम राबवण्याची योजना आहे.

भविष्यात आवळी येथील उंच डोंगरावर आध्यात्मिक केंद्र उभारून भगवान शंकराचा भव्य पुतळा उभारण्याचाही विचार असल्याचे त्यांनी नमूद केले. मल्लिकार्जुन देवस्थानाच्या नूतनीकरण व सुशोभीकरण प्रकल्पासाठी सुमारे ५ कोटी ४२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT