गोवा

Revolutionary Goans Party | चतुर्थीनंतर गोव्यात 'आरजी'चे मोठे सदस्य नोंदणी अभियान; आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

Revolutionary Goans Party | आमदार वीरेश बोरकर ; पक्षाच्या नवीन मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्याच्या हितासाठी आरजीसोबत येऊ इच्छिणाऱ्या सर्वांना सोबत घेऊन पक्ष पुढे जाणार आहे. गणेश चतुर्थीनंतर पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येईल, अशी घोषणा आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी शनिवारी येथे केली.

पाटो येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आमदार बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर नवनियुक्त सदस्यांना सभासदपत्रे देण्यात आली. यावेळी पक्षाध्यक्ष शविना नाईक शिरोडकर, सरचिटणीस मेल्वीन डिसिल्वा आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार बोरकर म्हणाले की, आरजीच्या तिन्ही जिल्हा समित्यांची निवड करण्यात आली आहे.

गटनिहाय समित्याची निवड लवकरच केली जाणार आहे. यासाठी विविध मतदारसंघांत बैठका घेऊन सभासदांना प्रोत्साहित केले जाईल. आगामी निवडणुकीत चांगले काम करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले जाईल.

पक्षाच्या नव्या चिन्हाचा रंग बदलण्याविषयी विचारले असता बोरकर म्हणाले की, पिवळा, काळा आणि पांढरा हे रंग एकत्रित करूनच २०२२ मध्ये पक्ष पुढे सरसावला होता. आता पुन्हा हेच रंग घेऊन पक्षाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाईल.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह समविचारी पक्षांशी बोलणी सुरू आहेत. सर्व विरोधी पक्षांनी खुलेपणाने एकत्र यावे, असे आवाहनही बोरकर यांनी केले.

संघटनवाढीवर भर : शविना नाईक

पक्षाध्यक्ष शविना नाईक शिरोडकर म्हणाल्या की, दहा दिवसांपूर्वी राज्य समितीची निवड करण्यात आली. त्यानंतर संघटनात्मक काम करताना चांगला अनुभव आला. अलीकडील साडेचार वर्षांतच नव्हे, तर त्याआधीपासून लोक आरजीशी जोडलेले आहोत. गोवा आणि गोंयकारांचे हित प्रथम ही भूमिका असून, समिती सदस्यांसोबत तळागाळात काम करून मजबूत संघटन उभारण्यात येईल. येणाऱ्या निवडणुकीला पक्ष सक्षमपणे सामोरा जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT