Daboli Airport 
गोवा

Dabolim Airport | दाबोळी विमानतळ सुरूच राहणार; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गोव्याच्या नेत्यांना दिले आश्वासन

Dabolim Airport | केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे खासदार तानावडे यांना आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या चालू कामकाजाची आणि भविष्यातील विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी गोव्याचे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो व खासदार सदानंद शेट तानावडे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.

यावेळी दाबोळी विमानतळाची सेवा सुरूच राहणार असल्याचे आश्वासन संरक्षणमंत्री सिंह यांनी दिली. दक्षिण गोवा जिल्ह्यातील दाबोळी विमानतळ गोव्याच्या कनेक्टिव्हिटी, पर्यटन, अर्थव्यवस्था आणि हजारो गोव्यातील लोकांच्या उपजीविकेसाठी कसे महत्त्वाचे आहे. यावर प्रकाश टाकणारे सविस्तर निवेदन गुदिन्हो यांनी यावेळी सादर केले.

दाबोळीच्या सुरळीत कामकाजासाठी आणि नियोजित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी संरक्षण मंत्रालयाचे सहकार्य आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. तानावडे म्हणाले की मला विश्वास आहे की संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाठिंब्याने दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळ गोव्यातील लोकांची सेवा करत राहील. हे विमानतळ राज्यासाठी चांगली कनेक्टिव्हिटी आणि शाश्वत विकासात योगदान देईल, तसे संरक्षण मंत्री सिंह यांनी सांगितल्याचे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT