Central government | कसाब, हाफिज सईद यांनाही जामीन देणार का? 
गोवा

Porvorim POCSO Case | विशेष पोक्सो न्यायालयाचा मोठा निर्णय, पर्वरीतील 'त्या' नराधम वडिलांचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला!

Porvorim POCSO Case | पर्वरी येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुलीच्या वडिलांचा जामीन अर्ज विशेष पोक्सो न्यायालयाने दुसऱ्यांदा फेटाळून लावला.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पर्वरी येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुलीच्या वडिलांचा जामीन अर्ज विशेष पोक्सो न्यायालयाने दुसऱ्यांदा फेटाळून लावला. संशयित हा पीडित मुलीचा वडील असून त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप असल्याने न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला.

फिर्यादीनुसार, डिसेंबर २०२५ मध्ये पर्वरीतील एका फ्लॅटमध्ये ही घटना घडली. पीडित मुलगी तिच्या वडिलांसोबत राहत होती, तर तिची आई नोकरीनिमित्त आखाती देशात वास्तव्यास होती. तक्रारीनंतर पर्वरी पोलिसांनी संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली, गोवा बालक कायदा तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यान्वये गुन्हा नोंदविला होता. २१ मे २०२६ रोजी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर आरोपीने न्यायालयात दुसऱ्यांदा जामिनासाठी अर्ज केला होता.

संशयिताचे वकिलांनी तपास पूर्ण झाल्याचे सांगत पीडितेकडून जामिनाला आक्षेप नसल्याचा दावा केला. तसेच प्रकरणात बलात्कार किंवा लैंगिक प्रवेशाचा आरोप नसून विनयभंगाच्या स्वरूपाचा गुन्हा असल्याचेही न्यायालयासमोर मांडले. त्यांनी मात्र, सरकारी वकिलांनी जामीन अर्जाला जोरदार विरोध केला.

संशयित हा पीडितेचा वडील आणि तिचा गोव्यातील एकमेव पालक असल्याने त्याची सुटका झाल्यास पीडितेवर दबाव येण्याची तसेच खटल्याच्या सुनावणीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. तसेच पीडितेच्या पुनर्वसन प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी बाल कल्याण समितीने समुपदेशक किंवा सहाय्यक व्यक्तीची नियुक्ती करावी आणि दोन आठवड्यांत अनुपालन अहवाल सादर करावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT