Flyover Pudhari
गोवा

Porvorim Flyover | पर्वरी उड्डाणपूल अपघातांवरून 'आप' आक्रमक; वाल्मिकी नाईक यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Porvorim Flyover | वाल्मिकी नाईक यांची परवरी उड्डाणपुलावरून सरकारवर टीका

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
भाजपचे महामार्ग प्रकल्प पूर्णपणे अपयशी आहेत. निवडणुकीच्या तोंडावर परवरी उड्डाणपुलावर होणारे अपघात याचा पुरावा आहे. सरकारी भ्रष्टाचारामुळे गोमंतकीयांचे प्राण जात आहेत. हा निर्माण झालेला दोष अभियांत्रिकी आहे. त्यावर तात्पुरती उपाययोजना करू नये, अशी मागणी आपचे अध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी केली आहे.

परवरी येथील उड्डाणपुलाच्या गोमंतक मराठी अकादमीकडील बाजूने पाहणी केल्यानंतर बोलताना नाईक म्हणाले की, उड्डाणपुलाच्या संदर्भातील दोष दूर करण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी नियुक्त केलेल्या नागपूर येथील आयआयएमसोबत मंत्र्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत त्यांची पात्रता गोमंतकीयांसमोर स्पष्ट करावी.

आयआयएमची नियुक्ती करून पुलासंबधी दोष त्यांच्यावर ढकलण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. सरकारी अपयशामुळे ऐन चतुर्थी सणात काही घरांत काळोख पडला.

मॅन्यूअल कादोझ म्हणाले, हे पूल विकासासाठी नव्हे, तर निवडणुकीच्या प्रसिद्धीसाठी आहे. कारण अपघातांतर टीका होऊ लागल्यावर दिशादर्शक आणि सूचना फलक लावले जाणार असल्याचे सांगितले जाते. जे पूर्वीच करायला हवे होते. विकासाच्या नावाने गोव्याचे नुकसान केले जात आहे. यावेळी पक्षाचे संदीपेडणेकर हेही उपस्थित होते.

... तर वेग कसा गाठणार?

सत्ताधारी भाजपकडून या पुलामुळे म्हापसा ते पणजी हे अंतर १४ मिनिटांऐवजी १० मिनिटांत गाठता येणार असल्याची जाहिरात केली जात होती. त्यामुळे पुलावर जर रम्बलर, वाहतूक सिग्नल घातले तर ही गती कशी गाठता येणार? महामार्ग बांधण्यासाठी काही मानक ठरलेले असतात. ते येथे पाळले गेले नाहीत. असे न करण्यासाठी कोणी सूचना दिली होती, त्याची चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी. पुलावर रम्बलर, वाहतूक सिग्नल हा उपाय नसून हे नियोजनाचे अपयश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT