Court File Photo
गोवा

Porvorim Crime News| पर्वरी गोळीबार प्रकरणी संशयित सतीश शिंदेला म्हापसा न्यायालयाकडून न्यायालयीन कोठडी

Porvorim Crime News| पर्वरीतील लिओ मॅजेस्टिक गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सतीश शिंदे याला म्हापसा न्यायालयाने नऊ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पर्वरीतील लिओ मॅजेस्टिक गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सतीश शिंदे याला म्हापसा न्यायालयाने नऊ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याने ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिलेल्या याचिकेवरील सुनावणी तहकूब करून तपास यंत्रणेला नोटीस बजावली आहे.

या प्रकरणाचा तपास करत असलेल्या क्राईम ब्राँचने अटक केलेल्या संशयितांच्या जबाबावरून बोरीवलीस्थित सतीश शिंदे याला दुबईला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर आला असता अटक करून गोव्यात आणले होते.

त्याला म्हापसा न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली होती ती वाढवून घेण्यासाठी उभे केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. गोळीबाराच्या या प्रकरणात यापूर्वीही काही संशयितांना अटक केली आहे. पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

गोळीबारामागील कारण, आरोपींची भूमिका, तसेच या घटनेशी संबंधित अन्य व्यक्तींचा सहभाग आहे काय, याचा तपास, तपास यंत्रणेकडून केला जात आहे. दरम्यान, शिंदे याच्या न्यायालयीन कोठडीदरम्यान पोलिसांकडून प्रकरणातील उपलब्ध पुरावे,

सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल संपर्क आणि इतर संबंधित बाबींच्या आधारे पुढील तपास करण्यात येत असल्याची माहिती क्राईम ब्राँच अधिकाऱ्यांनी दिली. कॅसिनो व्यवसायाशी संबंधित असलेल्या संशयित सतीश शिंदे याने त्याच्या अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT