arrest File Photo
गोवा

Porvorim Firing Case | पर्वरी गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! हल्लेखोरांच्या कारचालकाला मुंबईतून क्राईम ब्राँचकडून अटक

Porvorim Firing Case | आतापर्यंत क्राईम ब्राँचकडून आठजण गजाआड

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पर्वरी येथील निओ मॅजेस्टिक कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या गोळीबार कटकारस्थानप्रकरणी हल्लेखोरांना पसार होण्यास मदत केलेला कार चालक दिनाथ त्रिलोकी कोरी याला मुंबईतून क्राईम ब्राँचने अटक केली. त्यामुळे अटक केलेल्या संशयितांची संख्या आठ झाली आहे. या कार चालक संशयिताला म्हापसा न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

आतापर्यंत आठ संशयितांना या गोळीबार प्रकरणात क्राईम ब्राँचने अटक केली आहे. त्यामध्ये कार चालक दिनाथ त्रिलोकी कोरी, शुटर्स संशयित अर्पुथराज उर्फ अण्णा नडार व बाबू अली तसेच संशयित पवन सौर, काझू शेख, इसार अली व सूरज आचार्य तसेच सतीश शिंदे यांचा समावेश आहे. सर्व संशयित सध्या कोठडीतच आहेत. आणखी एक संशयित गोपाळ नाईक हा फरारी आहे.

सुनावणी ८ ऑक्टोबर रोजी

पोलीस कोठडीत असलेला बोरीवली (मुंबई) येथील संशयित सतीश शिंदे याने उच्च न्यायालयात अर्ज करून या हल्ल्याशी त्याचा काहीही संबंध नसल्याचा दावा करून त्याला सोडून देण्याचे निर्देश द्यावी अशी विनंती केली आहे. श्रीनिवास नायक यांनी हस्तक्षेप अर्ज सादर करून त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करून त्याला विरोध केला आहे. हे अर्ज (बुधवारी) सुनावणीस आले; त्यावरील सुनावणी ८ ऑक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT