PM Modi on Spirituality and Development
काणकोण : अध्यात्म, राष्ट्रसेवा व विकास यांच्या समन्वयाने विकसित भारत 2047 चे उद्दिष्ट निश्चित साध्य होईल. या प्रवासात पर्तगाळी मठ आणि गोवा राज्याची भूमिका महत्त्वाची असेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पर्तगाळी मठाच्या 550 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रभू श्रीरामाच्या 77 फूट उंच कांस्य मूर्तीचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या 550 वर्षांत या मठाने समाजातील अनेक स्थितंतरे पाहिली आहेत. युग बदलले देश आणि समाजात परिवर्तन झाले. मात्र बदलत्या काळातही या मठाने आपली दिशा बदलली नाही. याउलट हा मठ लोकांसाठी दिशादर्शक ठरला आहे, असेही मोदी म्हणाले.